राष्ट्रवादीकडून जबरदस्ती चुनाभट्टी-बीकेसी उड्डानपुलाचे उदघाटन करण्यात येत असल्याने त्यांना अडवण्यासाठी प्रियदर्शनी सर्कल येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैणात करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी याबाबत नोटिसा पाठवल्या आहेत.
जेसीबीवर चढून नवाब मलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी आंदोलन केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी सकाळी वाजातगाजत चुनाभट्टी-बीकेसी उड्डानपुलाजवळ आले. प्रियदर्शनीसमोर नबाव मलिक यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले. सुरूवातीला नवाब मलिक यांनी आजच्या आज उड्डानपुलाचे लोकार्पण करावी अशी भूमिका घेतली होती. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर नवाब मलिक यांनी प्रशासनाला आठ दिवसाची मुदत देत आंदोलन माघारी घेतले आहे. पोलिसांनी सिग्नल सुरू करण्यासाठी आठ दिवसांचा वेळ मागितला आहे. आठ दिवसांत पुल वाहतूकीसाठी सुरू करण्याचं आव्हान पोलिस आणि प्रशासनासमोर असेल.
आठ दिवसांमध्ये चुनाभट्टी-बीकेसी उड्डानपुल वाहतूकीस सुरू न केल्यास आता जेसीबी घेऊन आलो होतो पुढील वेळी रोलर आणू असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे. लोकशाही आघाडी सरकारच्या काळामध्ये मंजूर झालेल्या व MMRDA ने बांधलेल्या चुनाभट्टी – बीकेसी हा उड्डाणपुल वाहतूकीसाठी सुरू करावा यासाठी राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं.