ठाणे येथील बाळकुम परिसरातील इमारतीत राहणाऱ्या एका महिलेस बेशुद्ध करून तिच्यावर शेजाऱ्याने बलात्कार केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे.या प्रकरणी कापुरबावडी पोलिसांनी शेजाऱ्यास अटक केली आहे. बबलु लखन शहा, असे शेजाऱ्याचे नाव असून तो ठाण्यातील बाळकुमपाडा भागातील एका इमारतीत रहातो. याच इमारतीत पिडीत महिला राहत असून तिची बबुलच्या पत्नीसोबत ओळख होती. यातूनच तिची त्यांच्या घरी ये-जा असायची. १८ जानेवारी रोजी दुपारी बबलु घरात एकटाच होता. याच संधीचा फायदा घेऊन त्याने पिडीत महिलेला पत्नी बोलवित असल्याचे खोटे सांगून घरी बोलाविले आणि तिची मानगुटी पकडून तोंड दाबले. त्यामुळे ती बेशुद्ध झाली. त्याच अवस्थेत त्याने तिच्यावर बलात्कार केला. तसेच नवऱ्यास जीवे मारण्याची धमकी देऊन दोन लाख रुपयांची मागणी केली.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jan 2014 रोजी प्रकाशित
महिलेवर बलात्कार करणाऱ्या शेजाऱ्यास अटक
ठाणे येथील बाळकुम परिसरातील इमारतीत राहणाऱ्या एका महिलेस बेशुद्ध करून तिच्यावर शेजाऱ्याने बलात्कार केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे.
First published on: 24-01-2014 at 12:04 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neighbor who rape woman arrested