एसटी कर्मचाऱ्यांना वर्षांतून दोनदा भेट

हुद्दय़ानुसार फिकट होत जाणारा खाकी रंग.. आपत्कालीन परिस्थितीत सहज लक्षात यावे यासाठी रिफ्लेक्टर्सचा समावेश.. महिलांसाठी सलवार-कुर्त्यांवर खाकी रंगाचे जॅकेट.. अशा नव्या संरचनेसह नवा गणवेश एसटी कर्मचाऱ्यांना नव्या वर्षांत भेट मिळणार आहे. एसटीच्या ६८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एसटी कर्मचाऱ्यांच्या गणवेशात बदल होणार आहे. नव्या गणवेशात खाकी रंग कायम असला तरी कर्मचाऱ्याचा हुद्दा जसजसा बदलत जाईल तसा गणवेशाचा रंग फिकट होत जाणार आहे. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) यांनी याची रचना केली आहे.

Gold coins uk
किचनचे नुतनीकरण करताना मिळालं घबाड; १७ व्या शतकातील नाण्यांच्या लिलावातून मिळाले लाखो रुपये
Nagpur, boy died, electric shock,
नागपूर : विजेच्या धक्क्याने नऊ वर्षांचा मुलगा ठार
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?
Sam Bankman Fried
 ‘क्रिप्टो सम्राट’ सॅम बँकमन-फ्राइडला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

कर्मचाऱ्यांपुढे नव्या गणवेशाचे नुकतेच सादरीकरण करण्यात आले.एसटीतील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या गरजेनुसार हे गणवेश तयार करण्यात आले आहेत.  राज्यभरातील सुमारे एक लाखाहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षांत हे गणवेश दिले जातील. नव्या गणवेशासाठी महामंडळातील कर्मचारी संघटनांचेही मत विचारात घेण्यात आले होते. त्यांनी चालक-वाहकांसाठी गडद खाकी रंगाचा गणवेश निवडला आहे.

रस्त्यात बंद पडलेली बस दुरुस्त करताना रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहन चालकांना चालक-वाहक दिसावे यासाठी या गणवेशाला सुरक्षिततेच्या दृष्टीने रिफ्लेक्टर्स लावण्यात आले आहेत. असेच रिफ्लेक्टर्स यांत्रिक कर्मचाऱ्यांच्या गणवेशालाही लावण्यात आले आहेत.

चालक-वाहकांबरोबर वाहतूक नियंत्रक, सहायक वाहतूक निरीक्षक, वाहतूक निरीक्षक व सहायक वाहतूक अधिक्षक या संवर्गातील कर्मचाऱ्यांना खाकी रंगाचा गणवेश देण्यात आला आहे.

  • कर्मचाऱ्यांचा हुद्दा जसा बदलत जाईल, तसा खाकी रंग फिकट होत जाईल यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांना निळ्या रंगाचा गणवेश दिला जाईल. महिला कर्मचाऱ्यांसाठी सलवार कुर्ता स्वरुपातील गणवेश
  • कुर्त्यांवर जॅकेट असेल. जॅकेटला चार खिसे असतील
  • साडी नेसणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी जाड काठपदराची साडी व त्यावर जॅकेट असेल. वर्षांतून दोनदा गणवेश दिला जाईल