कोरोनामुळे गेली दोन वर्ष राज्यासह देशावर करोनाचे संकट होते. दोन वर्षांपासून मुंबईतून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना नेहमीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करता आला नाही. मात्र, यंदा सर्व सणांवरील बंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोकणात गावी जाणाऱ्यांसाठी बसेस आणि रेल्वे सोडण्यात येणार आहे. दरम्यान, या संदर्भात आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपा सरकारकडून कोकणात गणपतीसाठी विशेष ट्रेन आणि बसेस सोडण्यात येत आहे.
हेही वाचा – राज ठाकरे परवा मुंबईत बोलले आणि मनसे कार्यकर्त्यांनी आज ‘करुन दाखवले’; पुण्यात ‘त्या’ बॅनरची तुफान चर्चा
दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवासाठी निलेश राणे आणि भाजपातर्फे मोदी एक्सप्रेस सोडण्यात येते, ती यावर्षीही सोडण्यात येईल, राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, यंदा कोणणात जाणाऱ्यांसाठी बसेस आणि रेल्वेची सोय करण्यात आली आहे. कोकणवासीयांची जेवढी सेवा, भाजपा आणि आमच्याकडून होते आहे, तेवढी दुसरे कोणते पक्ष करत असतील, असं वाटत आहे. सध्या कोकणात बस आणि रेल्वे जातात आहे, भविष्यात विमानांचीही सोय आम्ही करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – Video : “नरेंद्र मोदींचा अहंकार भाजपाला संपवणार”, नाना पटोलेंचं भाजपावर टीकास्त्र; पाहा संपूर्ण मुलाखत!
दरम्यान, गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी सोडण्यात येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) तीन हजार गाड्यांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. कोकणासाठी गुरुवारपासून (२५ ऑगस्ट) जादा गाड्या सुरू होत असून या दिवशी २७ गाड्या रवाना केल्या जाणार आहेत, तर २८ ऑगस्टला १ हजार २४१ गाड्या कोकणासाठी मुंबई, ठाणे, पालघरमधून निघणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.
