मुंबई : सागरी किनारा रस्ता प्रकल्पाच्या कामासाठी गेल्या किमान चार वर्षांपासून बंद असलेला मरिन ड्राइव्ह येथील पदपथ पर्यटकांसाठी नव्याने खुला करण्यात आला. मात्र, या पदपथावर पूर्वीसारखी वृक्षलागवड करण्यात आलेली नाही. नव्याने बांधलेल्या पदपथाखाली समुद्राचा भाग असल्यामुळे त्याठिकाणी वृक्षरोपांची लागवड करता येणार नाही. त्यामुळे सुमारे किलोमीटर अंतराचा पदपथ उजाड राहण्याची चिन्हे आहेत.

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाच्या कामासाठी बंद करण्यात आलेला सुमारे १.०७ किलोमीटर अंतराचा पदपथ दहा दिवसांपूर्वी वापरासाठी पूर्ववत करण्यात आला. जी. डी. सोमाणी चौक ते सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह या टप्प्यातील पदपथ पादचाऱ्यांच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आला. शिवाय वाहतुकीसाठी १०.५६ मीटर रुंदीचा आणि १ किलोमीटर अंतराचा अतिरिक्त रस्ताही त्यामुळे खुला झाला आहे.

हेही वाचा – पाच महिन्यांत राज्यात एक हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

मार्गावरोधक (बॅरिकेड) हटवल्यामुळे पदपथ मोकळा झाला आहे. मात्र, झाडांची सावली नसल्यामुळे हा पदपथ उजाड दिसतो. तसेच दुपारी कडक उन्हाचे चटके बसतात. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते झोरू भतेना यांनी महानगरपालिका प्रशासनाला पत्र लिहिले आहे. सागरी किनारा मार्ग प्रकल्पातील बोगद्यांच्या बांधकामासाठी मरिन ड्राइव्ह येथील १६३ झाडे हटवण्यात आली होती. झाडांची सावली नसल्यामुळे हा पदपथ उजाड दिसतो. तसेच दुपारी कडक उन्हाचे चटके बसतात. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते झोरू भतेना यांनी पालिका प्रशासनाला पत्र लिहिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – पारपत्र गैरव्यवहार प्रकरण : दलालाच्या घरी व कार्यालयात शोध मोहीम, दीड कोटींच्या रकमेसह कागदपत्र जप्त

नवी रचना अशी…

  • खुला करण्यात आलेला मरिन ड्राइव्हचा भाग सागरी किनारा मार्गाच्या टोकाला (कॅण्टीलीवर) आहे. या भागाच्या खाली समुद्र असल्यामुळे इथे झाडे लावता येणार नाहीत, अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
  • त्याऐवजी बिर्ला क्रीडा केंद्र येथे हिरवळीच्या जागा तयार करण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांनी दिली.
  • या पदपथाच्या शेजारच्या समुद्राच्या भिंतीची उभारणी बीम आणि कॉलमचा वापर करून करण्यात आली आहे. त्यामुळे अतिरिक्त भराव न घालता आतील बाजूस नव्या पदपथाची उभारणी.
  • या पदपथाला धडकणाऱ्या समुद्राच्या लाटांचा आघात रोखण्यासाठी ‘टेट्रापॉड’चा वापर. पूर्वीसारखीच पर्यटकांसाठी बैठकव्यवस्था.