scorecardresearch

Premium

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीचे अडथळे दूर, कोकणवासीयांना दिलासा; कशेडी बोगद्यातून वाहतूक सुरू

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली असून या महामार्गावरील एक मार्गिकाही गणपतीपूर्वी वाहतुकीसाठी खुली केली जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी दिली.

kashedi tunnel open for ganpati
कशेडी बोगद्यातून वाहतूक सुरू

मुंबई: Mumbai Goa Highway मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली असून या महामार्गावरील एक मार्गिकाही गणपतीपूर्वी वाहतुकीसाठी खुली केली जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी दिली. या महामार्गावरील वाहतुकीतील महत्त्वाचे अडथळे दूर झाल्याने कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 गणपतीपूर्वी या महामार्गावरील कशेडी बोगदा तसेच एक मार्गिका खुली करण्याची घोषणा चव्हाण यांनी विधिमंडळात केली होती. या महामार्गावरील पोलादपूर-खेडदरम्यानचा ९ किलोमीटर लांबीचा कशेडी घाट पार करण्यासाठी सुमारे ४५ मिनिटे ते एक तास लागत असे. मात्र आता या घटात दोन किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात आला असून त्यातील एक मार्गिका चव्हाण यांच्या उपस्थितीत वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. या बोगद्यामुळे हा घाट आता केवळ १५ मिनिटांत पार करता येणार असल्याने प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.

Mumbai Pune Expressway The area near Khalapur toll plaza will be free of traffic congestion Mumbai news
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग: खालापूर पथकर नाक्याजवळील परिसर वाहतूक कोंडीमुक्त होणार
3 year old girl fall to death into a pothole on highway near titwala
टिटवाळ्याजवळ महामार्गाच्या खड्ड्यात पडून बालिकेचा मृत्यू
Inauguration of Panvel Margike on Shilphata flyover by cm eknath shinde traffic on JNPT and Thane route will be reduced
शिळफाटा उड्डाणपुलावरील पनवेल मार्गिकेचे लोकार्पण, जेएनपीटीसह ठाणे मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार
nawegaon more to surjagad 83 km long special highway for mining corridor approved by maharashtra government
गडचिरोली : जिल्ह्यातील ‘मायनिंग कॉरिडॉर’चा मार्ग मोकळा; ८३ किमी लांबीच्या विशेष महामार्गाला मंजुरी

हेही वाचा >>> बारसूमधील कातळशिल्पे संरक्षित यादीतून वगळली; कशेळीमधील कातळशिल्पांना ‘राज्य संरक्षित स्मारका’चा मान

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेत युद्धपातळीवर काम केल्याने हा बोगदा गणपतीपूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात यश आल्याने आता गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांचा प्रवास सुखाचा होईल. कोकणवासीयांना दिलेला शब्द पूर्ण करू शकलो याचे समाधान असल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले. या वेळी चव्हाण व कोकण विकास समितीचे पदाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. मुंबई-गोवा महामार्गाच्या एका मार्गिकेचे ९० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत गणपतीपूर्वी ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली केली जाईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: No traffic jams on mumbai goa highway started kashedi tunnel mumbai print news ysh

First published on: 13-09-2023 at 01:01 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×