भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर २४ ऑगस्टला त्यांना अटक करण्यात आली होती. २४ ऑगस्टला तारखेला उशिरा रात्री त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर टीका करत सवाल केले आहेत.
दरम्यान, आता जन आशिर्वाद यात्रा सुरु झाल्यावर पुन्हा टीका करणार का? असा प्रश्न नारायन राणे यांना विचारण्यात आला. यावर टीका करणार पण चांगल्या शब्दात, असे उत्तर राणे यांनी दिले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचाही नारायण राणे यांनी समाचार घेतला.
ते वाक्य मी परत बोलणार नाही
“मी असं काय बोललो होतो की राग आला. ते वाक्य मी परत बोलणार नाही. कोर्टाचा निकाल येईपर्यंत बोलणार नाही. भुतकाळामध्ये एखादी गोष्ट घडली आणि त्याची माहिती दिली. तो कसा गुन्हा होतो.” असा प्रश्न देखील नारायण राणे यांनी उपस्थित केला.
“सेना भवनाबद्दल बोलणाऱ्याचं थोबाड फोडा”, असं बोलणं गुन्हा नाही का? – नारायण राणे
देशाबद्दल अभिमान आहे म्हणून…
”त्यांना देशाबद्दल अभिमान नसतो. त्यांना राष्ट्रीय सण माहिती नसतात. मला देशाबद्दल अभिमान आहे म्हणून सहन झालं नाही. म्हणून जे आज बोललो ते रेकॉर्डवर आहे.” असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं. “ मुख्यमंत्र्यानी सेना भवनाबद्दल कोणी अशी भाषा वापरेल तर त्याचं थोबाडं तोडा, असे आदेश दिले. हा क्राईम नाही. कलम १२० अंतर्गत गुन्हा होत नाही.”, असा प्रश्नही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानाबाबत उपस्थित केला.