लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: मुंबई विद्यापीठातील दूर व मुक्त अध्ययन संस्था म्हणजेच ‘आयडॉलने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एमएमएस) व मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (एमसीए) हे दोन पदव्युत्तर अभ्यासक्रम दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून सुरु मान्यता दिली आहे. सदर दोन्ही अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षांचे ऑनलाइन अर्ज २४ जुलैपर्यंत https://mu.ac.in/distance-open-learning या संकेतस्थळावर भरता येणार आहेत. रविवार, १३ ऑगस्ट २०२३ रोजी सदर दोन्ही अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन माध्यमातून प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.

मुंबई विद्यापीठाने ‘एमएमएस’ व ‘एमसीए’सारखे महत्वाचे अभ्यासक्रम दूरस्थ माध्यमातून सुरु केले आहेत. त्यामुळे नोकरी सांभाळून शिक्षण घेणाऱ्यांसाठी आणि ज्या नियमित महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांना एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे’, असे मत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

आणखी वाचा-मुंबई विद्यापीठातील ६१ टक्के प्राध्यापकांच्या जागा रिक्त, अवघ्या १४२ जणांच्या जीवावर विद्यापीठाचा कारभार सुरु

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एआयसीटीई व यूजीसीने ‘आयडॉल’ला एमबीए या अभ्यासक्रमाच्या समकक्ष असणाऱ्या ‘एमएमएस’ या अभ्यासक्रमासाठी ७२० आणि ‘एमसीए’ या अभ्यासक्रमासाठी २००० जागांची मान्यता दिली आहे, हा दोन वर्षांचा सुधारित अभ्यासक्रम आहे. विशेष बाब म्हणजे ‘एमएमएस’ हा अभ्यासक्रम मनुष्यबळ, वित्त व विपणन या तीन विषयांमध्ये करता येतो.