शहरातील अनधिकृत बांधकाम तसेच अतिक्रमणांवर नियंत्रण आणण्यासाठी महानगरपालिकेने संगणक प्रणालीची मदत घेतली आहे. पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर अनधिकृत बांधकामांची तक्रार करणे शक्य होणार असले तरी त्याआधी तक्रारदाराने ओळखपत्र दाखल करून स्वतची नोंदणी करणे आवश्यक असल्याने यासाठी किती नागरिक पुढाकार घेतील त्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
पालिकेच्या http://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर – B & F Software या लिंकवर शहरातील विनापरवाना सुरू असलेल्या बांधकामांबाबत तक्रार करणे शक्य होईल. या प्रणालीचे संकेतस्थळ http://www.removalofencroachment.mcgm.gov.in आहे. मात्र अनेकदा चुकीच्या तक्रारी येत असल्याने तक्रारदारांची ओळख आवश्यक असून तक्रारदाराच्या नावाबाबत गुप्तता पाळण्यात येईल, पालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ही तक्रार संबंधित वॉर्डच्या अधिकाऱ्यांकडे पाठवली जाईल व तक्रार कोणत्या अधिकाऱ्याकडे कोणत्या कारणासाठी प्रलंबित आहे, त्याची माहिती तक्रारदारास तसेच पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संकेतस्थळावर पाहता येईल. या प्रणालीमुळे पारदर्शकता आल्याने माहिती अधिकाराच्या अर्जाची संख्याही कमी होईल, असे अतिक्रमण निर्मूलनचे उपायुक्त मिलिंद सावंत म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 24th May 2016 रोजी प्रकाशित
अनधिकृत बांधकामांविरोधात ऑनलाइन तक्रार शक्य
अनधिकृत बांधकाम तसेच अतिक्रमणांवर नियंत्रण आणण्यासाठी महानगरपालिकेने संगणक प्रणालीची मदत घेतली आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 24-05-2016 at 00:03 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online complaint possible against the unauthorized construction