मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणातील पाणीसाठा ३२.३२ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. हा गेल्या तीन वर्षांतील नीचांक असून केवळ दीड ते दोन महिनेच हे पाणी पुरणार आहे. जूनमध्ये पुरेसा पाऊस पडला नाही, तर जुलैपर्यंत पाणी पुरविण्याचे खडतर आव्हान महापालिकेसमोर असेल. 

उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणात मिळून ४ लाख ६७ हजार ७६६ दशलक्ष लिटर (३२.३२ टक्के) पाणीसाठा आहे. मुंबईला दररोज ३,८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. त्यानुसार आता उपलब्ध असलेले पाणी पुढील दोन महिने पुरेल. पालिकेच्या नियोजनानुसार एक टक्का पाणी तीन दिवस पुरते. म्हणजेच महिन्याला सुमारे १२ ते १३ टक्के पाण्याचा वापर होतो. मात्र उन्हाच्या झळा बसू लागल्या असून पाण्याचे बाष्पीभवन मोठया प्रमाणात होते. जूनमध्ये पुरेसा पाऊस होत नसल्याने हे पाणी जुलैपर्यंत पुरवावे लागते. गेल्यावर्षी २५ मार्चला ३८ टक्के तर २०२२मध्ये ४१ टक्के पाणीसाठा होता.

water supply, Kandivali,
कांदिवली बोरिवलीमध्ये गुरुवारपासून २४ तास पाणीपुरवठा बंद
Rain in summer in Nagpur risk of disease increase
नागपुरात उन्हाळ्यात पाऊस, ‘हे’ आजार वाढण्याचा धोका..
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

हेही वाचा >>> माहीमजवळ समुद्रात बुडून एकाचा मृत्यू; तिघांना वाचविले; एक बेपत्ता

पाणीसाठा ५० टक्क्यांवर आल्यानंतर दरवर्षीप्रमाणे पालिका प्रशासनाने भातसा धरणातून १ लाख ३७ हजार दशलक्ष लिटर तर वैतरणा धरणातून ९२.५ दशलक्ष लिटर राखीव साठयाची मागणी केली होती. या मागणीला राज्य सरकारने मंजुरी दिल्यामुळे प्रस्तावित १० टक्के पाणीकपात मागे घेण्यात आली. सध्याचा पाणीसाठा संपल्यानंतर राखीव साठयातील पाण्याचा वापर करण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

मात्र भांडूप जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीच्या कामामुळे २४ एप्रिलपर्यंत पाच टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यातच पावसाने ओढ दिली होती व ऑक्टोबर महिना कोरडा गेला होता. दरवर्षी ऑक्टोबपर्यंत पाऊस पडत असल्याने धरणे काठोकाठ असतात. 

धुळवडीला हजारो लिटर पाण्याची नासाडी

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही संपूर्ण मुंबईत मोठया जल्लोषात धुळवड साजरी झाली. रंगांबरोबरच पाण्याचाही अमर्याद वापर मुंबईकरांनी केला. ठराविक रक्कम भरून आयोजित करण्यात आलेल्या पाटर्य़ा आणि कार्यक्रमांत हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली. याव्यतिरिक्त, मुंबईतील अनेक गृहनिर्माण संस्था आणि झोपडपट्टी परिसरात पाण्याचा अमर्याद वापर करण्यात आला. काही ठिकाणी खास ‘रेन डान्स’चे आयोजन करण्यात आले होते. पहाटे सुरू झालेला हा कल्लोळ सायंकाळपर्यंत कायम होता.

धरणांतील पाणीसाठा

वर्ष          पाणीसाठा (दशलक्ष लिटर)         टक्केवारी

२५ मार्च २४       ४,६७,७६६                   ३२.३२%

२५ मार्च २३       ५,६३,१८१                  ३८.९१%

२५ मार्च २२       ६,०६,७४१                  ४१.९२ %