मुंबई : मुंबईत ऑक्टोबरमध्ये घरांच्या विक्रीत मोठी वाढ होईल अशी अपेक्षा बांधकाम क्षेत्राकडून व्यक्त होत होती. नवरात्रोत्सव आणि दसरा या सणासुदीच्या काळात घरखरेदीकडे ग्राहकांचा मोठा कल असतो. त्याअनुषंगाने घरविक्रीत वाढ होण्याची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात या महिन्यात घरविक्री स्थिर राहिली आहे. ऑक्टोबरमध्ये १०,३९० घरांची विक्री झाली असून राज्य सरकारला घरविक्रीतील मुद्रांक शुल्काच्या रुपात ८२२ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. तर मागील चार महिन्यांपासून घरविक्रीचे प्रमाण १०,२०० ते १०,९०० च्या दरम्यान होते. त्यामुळे सणासुदीच्या काळातही मोठ्या प्रमाणावर घराची विक्री होऊ शकलेली नाही.

सर्वसाधारणपणे पावसाळ्यात बांधकाम क्षेत्रात मंदी असते आणि नवरात्रोत्सवापासून नवीन वर्षांपर्यंत बांधकाम व्यवसायत मोठी तेजी येते. त्यानुसार यंदाही बांधकाम क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. मात्र घरविक्रीत मोठी वाढ दिसून येत नाही. ऑक्टोबरमध्ये नवरात्रोत्सव आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर घरविक्री वाढेल अशी अपेक्षा होती. पण मागील पाच महिन्यांपासून घरविक्री स्थिर आहे. दहा ते अकरा हजारांच्या आसपास घरे विकली जात आहेत. ऑक्टोबरमध्ये १०,३९० घरांची विक्री झाली असून यातून ८२२ कोटी रुपये महसूल मिळाला. तर सप्टेंबरमध्ये १०,६९३ घरांच्या विक्रीतून १,१२६ कोटी रुपये महसूल मिळाला होता. ऑगस्टमध्येही घरविक्री अकरा हजारांचा पल्ला पार करू शकली नाही. ऑगस्टमध्ये १०,९०२ घरांची विक्री झाली असून यातून ८१० कोटी रुपये महसूल मिळाला. तर जुलै आणि जुनमध्येही घरविक्री स्थिरच होती. जुलैमध्ये १०,२२१ घरे विकली गेली आणि त्यातून ८३० कोटी रुपये महसूल मिळाला. मेमध्ये मात्र घरविक्री दहा हजारांचा टप्पा गाठू शकली नव्हती. मेमध्ये ९,८२३ घरांची विक्री झाली आणि यातून ८३२ कोटींचा महसूल मिळाला. मात्र या वर्षातील आतापर्यंतची सर्वात जास्त घरांची विक्री मार्चमध्ये झाली. मार्चमध्ये १३,१५१ घरांची विक्री झाली आणि यातून १,२२५ कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत जमा झाले. फेबुवारी आणि जानेवारीत दहा हजारांहून कमी घरांची विक्री झाली होती.

heat waves, weather,
यंदाचा एप्रिल महिना उष्णतेच्या लाटांचा; पुढील पाच दिवस पारा आणखी वाढणार
credit card spending soar to 27 percent
क्रेडिट कार्ड उसनवारी २७ टक्क्यांनी वाढून १८.२६ लाख कोटींवर
Tesla chief, Elon Musk, electric car, investment, india
‘टेस्ला’कडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक? एलॉन मस्क यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज
400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?

हेही वाचा – मुंबई : ऑनलाईन फसवणुकीतील ९० टक्के रक्कम परत मिळविण्यात यश

हेही वाचा – मुंबई : पूर्व उपनगरात गुरुवार, शुक्रवारी पाणीपुरवठा बंद; चेंबूर, गोवंडीसह ‘या’ परिसरातील नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

ऑक्टोबरमध्ये १०,३९० घरांची विक्री झाली असून मागील पाच महिन्यांपासून घरविक्री स्थिर असली तरी मागील दहा वर्षांतील ऑक्टोबरमधील घरविक्रीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. २०१३ ते २०१९ या कालावधीत घरांच्या विक्रीचे प्रमाण ४९०० ते ६३०० दरम्यान होते. तर २०२० ते २०२२ या काळात ८००० ते ८५०० इतकी घरविक्री झाली होती. पण यंदा मात्र ऑक्टोबरमध्ये १० हजारांहून अधिक घरे विकली गेली असून ही दहा वर्षांतील ऑक्टोबरमधील मोठी संख्या आहे. दरम्यान आता नोव्हेंबरमध्ये दिवाळी असून या काळात घरविक्रीची संख्या वाढेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.