मुंबई : मुंबई-पुणे मार्गासह कोकण मार्गावरील रेल्वेच्या विस्टाडोम डब्यांना प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. एप्रिल ते जून २०२२ या काळात या डब्यांना शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असून त्यामुळे मध्य रेल्वेला चांगला महसूल मिळाला. जुलै महिन्यातही विस्टाडोमला मिळत असलेला हा प्रतिसाद कायम असून २५ जुलैपासून सेवेत आलेल्या प्रगती एक्स्प्रेसच्या विस्टाडोम डब्यालाही पुण्यातून ९३ टक्के प्रतिसाद मिळाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.

मुंबई ते पुणे ते मुंबई डेक्कन क्वीन, मुंबई ते पुणे ते मुंबई डेक्कन एक्स्प्रेसला आणि मुंबई ते मडगाव ते मुंबई जन शताब्दी एक्स्प्रेसला विस्टाडोम डबा जोडलेला आहे. एका डब्याची प्रवासी क्षमता ४० आहे. काचेचे छत असलेल्या या डब्यांना गेल्या तीन ते चार वर्षांत प्रवाशांकडून चांगली पसंती मिळत आहे. रुंद खिडक्या, एलईडी दिवे, उत्तम आसनव्यवस्था, जीपीएस आधारित माहिती प्रणाली, एलईडी स्क्रीन, अपंगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजे अशा अनेक सुविधाही आहेत.

Shiv Panvel Highway, Accident, Accident on Shiv Panvel Highway, Ola App Passengers, Raises Safety Concerns, ola drivers, ola cab, marathi news, panvel news, panvel, accident news,
शीव-पनवेल महामार्गावरील रात्रीच्यावेळी प्रवास सुरक्षित आहे का ?
uran potholes marathi news
उरण: खोपटे-कोप्रोली मार्गावर खड्ड्यांचे विघ्न कायम, एकाच ठिकाणी खड्डे कसे? प्रवाशांचा सवाल; कोट्यवधी रुपये खर्च करूनही दुरवस्था
Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
Traffic Congestion Worsens in bandra santacruz vakola
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याची गरज

एप्रिल ते जून २०२२ या कालावधीत डेक्कन एक्स्प्रेसला ९० ते १०० टक्के, डेक्कन क्वीन एक्स्प्रेसला ९९ ते १०० टक्के आणि जनशताब्दी एक्स्प्रेसला ९७ ते १०७ टक्के प्रतिसाद मिळाल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. सर्वात जास्त प्रतिसाद मे व जून महिन्यातच आहे. जुलै महिन्यातही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. करोनाकाळात बंद असलेली प्रगती एक्स्प्रेस मध्य रेल्वेने मुंबई-पुणे मार्गावर २५ जुलैपासून पुन्हा सुरू केली. या गाडीलाही विस्टाडोम डबा जोडला आहे. सोमवारी पुण्यातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या या गाडीच्या विस्टाडोममधून ४४ पैकी ४१ आसने आरक्षित झाली होती. जवळपास ९३ टक्के प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले.

विस्टाडोममुळे मिळालेले उत्पन्न

*  जनशताब्दी एक्स्प्रेस विस्टाडोम- १ कोटी ७१ लाख ७२ हजार १०६ रुपये 

*  डेक्कन क्वीन एक्स्प्रेस विस्टाडोम – ६८ लाख ७५ हजार ७६३ रुपये

*  डेक्कन एक्स्प्रेस विस्टाडोम – ६२ लाख ५१ हजार ४१५ रुपये