मुंबई : मध्य रेल्वेवरील मडगाव एक्स्प्रेस आणि डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेसला असलेल्या विस्टाडोम डब्यांना (पारदर्शक काचेचा डबा) प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ऑक्टोबर २०२१ ते २३ मे २०२२ या कालावधीत मध्य रेल्वेला या सेवेतून सहा कोटी ४४ लाख रुपये महसूल प्राप्त झाला आहे.

मुंबई- पुणे- मुंबई डेक्कन क्वीन, मुंबई- पुणे- मुंबई डेक्कन एक्स्प्रेस आणि मुंबई- मडगाव- मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसला व्हिस्टाडोम डबा जोडला आहे. एका डब्यांची प्रवासी क्षमता ४० आहे. काचेचे छत असलेले या डब्यांना गेल्या तीन ते चार वर्षांत प्रवाशांकडून चांगली पसंती मिळत आहे. ऑक्टोबर २०२१ ते २३ मे २०२२ या कालावधीत जनशताब्दी एक्स्प्रेसच्या व्हिस्टाडोम डब्यातून १८ हजार ६९३ प्रवाशांनी प्रवास केला असून तीन कोटी ७० लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. १०० टक्के प्रतिसाद असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. सीएसएमटी- पुणे- सीएसएमटी डेक्कन क्वीनला पुणे ते मुंबई प्रवासात ९९ टक्के प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला असून एक कोटी ६३ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. याशिवाय डेक्कन एक्सप्रेसमधून १६ हजार ४५३ प्रवासी वाहतुकीतून एक कोटी ११ लाख रुपये महसूल प्राप्त झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला २०१८ मध्ये विस्टाडोम डबा पहिल्यांदा जोडण्यात आला होता. या डब्यांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे २६ जून २०२१ पासून मुंबई – पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्येही विस्टाडोम डबा जोडण्यात आला.

सुविधा काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काचेच्या छताशिवाय रुंद खिडक्या, एलईडी दिवे, उत्तम आसन व्यवस्था, जीपीएसआधारित माहिती प्रणाली, एलईडी स्क्रिन, अपंगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजे अशा अनेक सुविधा आहेत.