मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सर्व प्रकारच्या बसगाड्यांमध्ये दिव्यांग प्रवाशांना कायमस्वरूपी आरक्षित आसन देण्यात आले असून, ते कोणत्याही थांब्यावर चढल्यास त्यांना त्यांचे आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे, असा निर्णय नुकताच एसटी महामंडळाने घेतला आहे.

एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने एक परिपत्रक काढून एसटीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बसगाड्यांमध्ये दिव्यांगांसाठी आसन आरक्षण निश्चित केले आहे. साध्या बसपासून शिवनेरी बसपर्यंत दिव्यांग प्रवाशांना प्रवासाच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचे आरक्षित आसन केवळ त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याची सूचना एसटी महामंडळाने स्थानिक एसटी प्रशासनाला केल्या आहेत. ज्यावेळी बसमध्ये दिव्यांग प्रवासी प्रवास करीत नसतील तेव्हा ते आसन सामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध होईल. मात्र दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर बसमध्ये चढल्यावर त्यांना ते आसन तातडीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबधित वाहकाची असेल.

ST diesel buses will start in October mumbai news
ऑक्टोबरमध्ये एसटीच्या साध्या डिझेल बस दाखल होणार
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
Ganesh Visarjan 2024
Ganesh Visarjan 2024: गणपती बाप्पाबरोबर चार लाखांच्या सोन्याच्या साखळीचेही विसर्जन; मग काय १० हजार लिटर पाणी उपसलं, अन्…
Ayushman bharat yojana benefits
‘आयुष्मान कार्ड’ ऑनलाइन कसे काढायचे? मोफत उपचार कोणत्या आजारांवर होतात, योजनेसाठी पात्रता काय? जाणून घ्या
states all primary schools closed on September 25
राज्यातील सर्व शाळा २५ सप्टेंबर रोजी बंद
New procedure regarding online booking by LPG Company to customers
आता ‘ओटीपी’ सांगितल्याशिवाय गॅस सिलेंडर मिळणारच नाही; कशी आहे नवीन प्रक्रिया?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Mumbai: Video Of Last Man To Take Darshan Of Lalbaugcha Raja Goes Viral
“वेळ बदलायला वेळ लागत नाही” तासाभरापूर्वी रांगेत चेंगरणारा क्षणात VIP झाला; लालबागच्या राजाचा सर्वात नशिबवान भक्त; पाहा VIDEO

हेही वाचा – मुंबई : गणेशोत्सव काळात बेस्टच्या जादा बस सेवा

हेही वाचा – मुंबई : गणेशोत्सव काळात सागरी किनारा मार्ग २४ तास खुला, वाहतुकीत बदल

याबरोबरच दिव्यांगांना प्रवास करताना कोणती अडचण येऊ नये म्हणून त्यांना बसमध्ये चढ-उतार करताना प्राधान्य द्यावे. तसेच त्यांचा थांबा आल्यानंतर त्यांना अवगत करून बसमधून उतरण्यासाठी चालक, वाहकांनी सर्वतोपरी मदत करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. यामुळे दिव्यांगाचा प्रवास यापुढे अधिक सुखकर व आरामदायी होईल, असा विश्वास एसटी महामंडळाकडून व्यक्त करण्यात आला.