भाडेवाढीनंतर रिक्षा-टॅक्सी मीटर रिकॅलिब्रेशनचे (मीटर बदल) आणि त्यानंतर मीटर प्रमाणित करण्याचे काम सध्या मुंबईत सुरू आहे. मीटर प्रमाणित करण्याचे काम मुंबई रिक्षामेन्स युनियनकडे सोपविण्याचा निर्णय मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने नुकताच घेतला आहे. या निर्णयाला मुंबई ग्राहक पंचायतीने विरोध केला असून मुंबई रिक्षामेन्स युनियनला दिलेली परवानगी रद्द करण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा >>>मुंबई: होर्डिंगवर चढून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
रिक्षा-टॅक्सी मीटर रिकेलिब्रेशन प्रक्रियेत अचूकता आणि विश्वासार्हता हे महत्त्वाची आहे. ज्या घाटंकांचे हितसंबंध मीटर रिकेलिब्रेशन प्रक्रियेत बाधित होतात किंवा त्यांचे स्वारस्य असते. मीटर उत्पादक, रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघटना, ग्राहक संघटनांनी या प्रक्रियेपासून दूर राहण्याचे पथ्य पाळणे गरजेचे आहे. या तिन्ही घटकांपैकी कोणावरही रिकेलिब्रेशची जबाबदारी सोपाविण्यात आली, तर या प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रशचिन्ह उभे राहू शकते. मीटरमध्ये छेडछाड करून प्रवाशांकडून जादा भाडे आकरण्यात येत असल्याच्या तक्रारी आरटीओकडे येत असतात. त्यामुळे ज्यांच्याविरोधात तक्रार करण्यात येत आहेत, त्यांनाच मीटर प्रामाणित करण्याची जबाबदारी देणे योग्य ठरणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या मागणीपत्रात मुंबई ग्राहक पंचायतीने नमुद केले आहे. त्यामुळेच प्राधिकरणाने घेतलेला हा निर्णय रद्द कारण्याची मागणी केल्याचे ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी सांगितले.