मुंबई : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) प्रकरणात मुंबई व परिसरातून अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींच्या कोठडीत सोमवारी सत्र न्यायालयाने ३ ऑक्टोबपर्यंत वाढ केली. राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, जालना, मालेगाव येथील घर, कार्यालयांवर छापा टाकून २० जणांना अटक केली होती.

मुंबईसह राज्यात याप्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यात आले होते. मुंबईत दाखल गुन्ह्यांत मुंबई व परिसरातून शेख सादिक, मेहम्मद इकबाल खान, मजहर खान, मोमीन मिस्त्री व आसिफ खान या पाच जणांचा अटक करण्यात आली. या पाच आरोपींची कोठडी सोमवारी संपल्यामुळे एटीएसने या पाच आरोपींना न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने त्यांच्या कोठडीत ३ ऑक्टोबपर्यंत वाढ केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पीएफआयप्रकरणी नांदेड येथून मोहम्मद अली आबेद अली या फरार युवकास  दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे.