मुंबई : दुसऱ्या पंथाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सर जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात चार राज्यांतील मौलवींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मौलाना अख्तर अब्बास (उत्तर प्रदेश), मौलाना तकवीर रजा अबिदी (आंध्र प्रदेश), मौलाना गुलाम मोहम्मद मेहंदी (तमिळनाडू) आणि मौलाना गुलाम हसन मट्ट(जम्मू कश्मीर) अशी या गुन्हा दाखल झालेल्या मौलवींची नावे आहेत.
तक्रारीत १८ ऑक्टोबरला डोंगरी येथे आयोजित कार्यक्रमांदरम्यान या मौलवींनी दुसऱ्या पंथाच्या प्रथेबाबत टीका करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पाकिस्तानातील मौलवीचे समर्थन केल्याचाही आरोप तक्रारदाराने केला आहे. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तपास सुरू असून गुन्ह्याशी संबंधितांचे जबाब नोंदविण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.