मुंबई: लिव्ह ॲण्ड रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यासोबत वाद झाल्याने कुर्ला परिसरात राहणाऱ्या एका महिलेने गुरुवारी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र यासंदर्भात माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या नेहरू नगर पोलिसांना या तरुणीचे प्राण वाचवले.

हेही वाचा – पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी अखेर ‘नाना’ला २६ वर्षांनंतर अटक

हेही वाचा – बदलापूर प्रकरण : न्यायालयीन कामकाजात ढवळाढवळ करू नका, मृत आरोपीच्या कुटुंबीयांच्या वकिलांना उच्च न्यायालयाची ताकीद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुर्ल्यातील नेहरू नगर परिसरात गुरुवारी दुपारी ही घटना घडली आहे. सदर ३५ वर्षीय महिला तिच्या मित्रासोबत म्हाडा इमारतीमध्ये राहते. दोघांमध्ये गुरुवारी वाद झाल्याने तिने खोलीत जाऊन गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याच वेळी तिच्या मित्राने याची माहिती नेहरू नगर पोलिसांना दिली. नेहरू नगर पोलिसांचे निर्भया पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिलेला अडवले. त्यानंतर तिला पोलीस ठाण्यात आणून तिचे समुपदेशन करण्यात आले. निर्भया पथकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे या महिलेचे प्राण वाचले.