पूर्व द्रुतगती मार्गावरील सुमन नगर सर्कल येथे बुधवारी रात्री भरधाव वेगात आलेल्या डंपरने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी चालवत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला. या अपघातामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातात दुचाकीस्वार सूरज पाटीलचा मृत्यू झाला. नवी मुंबईतील पोलीस कर्मचाऱ्याचा तो मुलगा होता.

हेही वाचा >>> मुंबईतील खड्डे कधी भरून निघणार? नितीन गडकरींचं समाधानकारक अन् चोख उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुधवारी रात्री १० च्या सुमारास सूरड दुचाकीवरून शीव येथून नवी मुंबईच्या दिशेने जात होता. याच वेळी सुमन नगर सर्कल परिसरातील शाहीर अण्णाभाऊ साठे उड्डाणपुलाखाली त्याच्या दुचाकीला एका डंपरने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. काही स्थानिक रहिवाशांनी त्याला रस्त्याच्या बाजूला घेतले आणि रुग्णवाहिकेसाठी मोबाइलवरून संपर्क साधला. मात्र अर्धा तास उलटून गेल्यानंतरही रुग्णवाहिका न आल्याने अखेर त्याला पोलिसांच्या गाडीतून रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.