मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीत जी मतचोरी केली, त्याविरोधातील लढाईत ‘वंचित बहुजन आघाडी’ काँग्रेसबरोबर लढू इच्छिते, अशी माहिती ‘वंचित’चे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
‘विधानसभा निवडणुकीनंतर ‘वंचित’ने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना पत्र लिहून या लढाईला साथ देण्याची मागणी केली होती. काँग्रेसने आमच्या मागणीला प्रतिसाद दिला असता तर आयोगाची मतचोरी पूर्वीच समोर आली असती. भारतीय लोकशाही आणि संविधान धोक्यात असून, या लढाईत सर्व विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे ॲड. आंबेडकर म्हणाले.