रंगभूमीवर १०,७०० प्रयोग सादर करून ‘विक्रमादित्य’ बनलेले प्रशांत दामले यांचा मुंबई महापालिकेतर्फे ११ मार्च रोजी नागरी सत्कार करण्यात येणार आहे. प्रशांत दामले यांनी अलीकडेच ‘गेला माधव कुणीकडे’ नाटकाचा प्रयोग सादर करीत रंगमंचावर १०,७०० व्या प्रयोगांचा टप्पा गाठला. नाटकांचे सर्वाधिक प्रयोग सादर करण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदविला गेला आहे. या विक्रमाची दखल घेऊन महापौर सुनील प्रभू यांनी प्रशांत दामलेचा नागरी सत्कार करण्याची घोषणा केली होती. प्रशांत दामलेचा ११ मार्च रोजी पालिका सभागृहात नागरी सत्कार करण्याच्या ठरावास गुरुवारी महासभेत मंजुरी देण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 8th Mar 2013 रोजी प्रकाशित
प्रशांत दामले यांचा ११ मार्चला पालिकेतर्फे सत्कार
रंगभूमीवर १०,७०० प्रयोग सादर करून ‘विक्रमादित्य’ बनलेले प्रशांत दामले यांचा मुंबई महापालिकेतर्फे ११ मार्च रोजी नागरी सत्कार करण्यात येणार आहे. प्रशांत दामले यांनी अलीकडेच ‘गेला माधव कुणीकडे’ नाटकाचा प्रयोग सादर करीत रंगमंचावर १०,७०० व्या प्रयोगांचा टप्पा गाठला.
First published on: 08-03-2013 at 01:54 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prashant damle will be hounred by bmc