मुंबई : जुन्या निवृत्ती वेतनावरून राज्य सरकार आणि सरकारी-निमसरकारी कर्मचारी यांच्यातील संघर्ष पेटला असतानाच विविध स्तरावरील शासकीय आणि निमशासकीय पदे आता बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार सरकारचे विविध विभाग तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यांना आवश्यस असणारे अधिकारी, कर्मचारी आता बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून घेतले जाणार असून त्यासाठी नऊ मनुष्यबळ पुरवठादार संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवून विकास कामांसाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे. त्यानुसार सुरुवातीला सफाई कामगार, शिपाई अशी चतुर्थ श्रेणीतील काही कर्मचारी बाहययंत्रणेतून घेण्याचा प्रयोग यम्शस्वी ठरल्यानंतर आता या धोरणाची व्याप्ती वाढवत सरकारी-निमसरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण करण्याच्या दिशेने सरकारने पाऊल टाकण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता सरकारसोबतच निमशासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व सरकारशी सबंधित अन्य कार्यालायातील नोकरभरती खाजगीकरम्णाच्या माध्यमातून केली जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या ८ मार्च रोजी झालेल्या बैठकीत याबाबतच्या नोकर भरती धोरणास मान्यता देण्यात आली असून त्यानुसार उद्योग-कामागार विभागाने मंगळवारी याबाबतचा शासन निर्णयही घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता कोणत्याही विभागाला नोकर भरती करताना सरकारने नेमलेल्या मनुष्यबळ पुरवठा एजन्सीकडूनच नोकरभरती करावी लागेल.

More Stories onमुंबईMumbai
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Privatization of government jobs state teachers law officers allowed filled from external sources ysh
First published on: 15-03-2023 at 00:02 IST