मुंबई: कोकणातील बारसूमधील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या विरोधातील शेतकऱ्यांना भेटण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बारसू भेटीकडे प्रकल्पग्रस्तांनी पाठ फिरविली. त्यामुळेच ठाकरे यांना बाहेरची माणसे घेऊन जावे लागल्याची टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी केली. प्रकल्पविरोधकांना भेटणाऱ्या ठाकरे यांनी प्रकल्प समर्थकांनाही भेटायला हवे होते असा टोलाही त्यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पस्थळी बारसू आणि सोलगाव आदी ठिकाणी भेट देऊन प्रकल्प विरोधकांशी संवाद साधला. ठाकरे यांच्या या भेटीवर रत्नागिरीचे पालकमंत्री सामंत यांनी टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणूक २०१९ निकाल

समाज माध्यमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना सामंत यांनी, ठाकरे यांच्या बारसू भेटीचा अट्टहास का होता अशी विचारणा केली.  स्थानिक प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार ठाकरेंनी ग्रामस्थांशी संवाद साधला त्यावेळी तेथे ग्रामस्थांपेक्षा बाहेरून आणलेली संख्या जास्त होती, असा दावा सामंत यांनी केला. ठाकरेंनी पंतप्रधानांना १२ जानेवारी २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवताना ग्रामस्थांना विश्वासात का घेतले नाही. या पत्राच्या माध्यमातून त्यांनीच ही जागा सुचविली आणि या प्रकल्पामुळे कोकणाचा विकास होईल असा दावाही केला होता. मात्र आता त्यांनी भूमिका का बदलली याचा खुलासा ठाकरे यांनी करावा अशी मागणी सामंत यांनी केली. शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या सर्वच शंका दूर करून आम्ही हा प्रकल्प पुढे नेऊ, शेतकऱ्यांना बाजूला ठेवून, अडचणीत आणून, वेगळे निर्णय न घेता प्रकल्प चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना समजावून सांगून हा प्रकल्प राबविला जाईल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Project victims ignore uddhav thackeray visit to barsu claim by minister uday samant zws
First published on: 07-05-2023 at 05:30 IST