मुंबई : ब्रिचकँडीमधील रहिवाशांनी विरोध केला म्हणून कोट्यवधी रुपये खर्चाचा वाहनतळ प्रकल्प रद्द करणाऱ्या मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दादरच्या शिवाजी पार्कमधील रहिवाशांनी जाब विचारला आहे. शिवाजी पार्क मैदानातील धुळीचा प्रश्न सोडवण्यासाठी गेली आठ वर्षे आंदोलने करूनही मुंबई महापालिका त्यावर उपायजोजना का करीत नाही, असा सवाल येथील आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

सागरी किनारा मार्ग प्रकल्पांतर्गत ब्रिच कँडी येथे भूमिगत वाहनतळ उभारण्यात येणार होते. त्याकरिता खोदकामही करण्यात आले होते. मात्र येथील रहिवाशांनी केलेल्या विरोधानंतर हा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने रद्द केला. कोट्यावधी रुपये खर्चाचा हा प्रकल्प पालिकेने भुर्दंड सोसून रद्द केला. मात्र या निर्णयाचे आता पडसाद उमटू लागले आहेत. शिवाजी पार्क येथील रहिवाशांनी या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित केले आहेत.

हेही वाचा >>>Shah Rukh Khan’s house recced: सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीनं शाहरुख खानच्या घराचीही केली होती रेकी, पोलिसांची माहिती

शिवाजी पार्क मैदानातील लाल मातीच्या धुळीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. मैदानातील माती काढण्याची रहिवाशांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. तब्बल ९८ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावरील या मैदानातून उडणाऱ्या धुळीची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. धुळीची समस्या दूर करण्यासाठी आतापर्यंत रहिवाशांनी अनेकदा पालिकेकडे पाठपुरावा केला, आंदोलन केले. मात्र गेल्या कित्येक वर्षात या समस्येवर तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे ब्रिचकँडीच्या रहिवाशांनी आंदोलन केल्यावर तातडीने निर्णय घेणारे महापालिका प्रशासन शिवाजी पार्कच्या धुळीच्या प्रश्नावर मात्र वेळकाढूपणा करत असेल्याचा आरोप येथील रहिवाशानी केली आहे.सध्या या मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचा सराव सुरु आहे. तेव्हा मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असल्याचा आरोपही रहिवाशांच्या प्रतिनिधिनी केला आहे.

हेही वाचा >>>अभिनेता सैफ अली खानवर हल्ला: एक संशयीताला ताब्यात

श्रीमंतांसाठीच महापालिका

या प्रश्नावर आंदोलन करणारे शिवाजी पार्कचे रहिवासी प्रकाश बेलवडे म्हणाले की, शिवाजी पार्कचे मराठी रहिवासी गेली आठ वर्षे रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. पण पालिका प्रशासन त्यावर काहीही करत नाही. मात्र ब्रिचकँडीच्या अमराठी रहिवाशांसाठी प्रकल्प रद्द केला. महापालिका ही श्रीमंतसाठीच काम करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी अधिकाऱ्यांसोबत शिवाजी पार्क मैदानाची पाहणी केली होती. शिवाजी पार्क मैदानावर उडणाऱ्या धुळीमुळे आजूबाजूच्या परिसरात होणाऱ्या त्रासाची पाहणी कदम यांनी केली होती. त्यानंतर शिवाजी पार्क मैदानातील धुळीच्या प्रश्नाबाबत पंधरा दिवसात महानगरपालिकेने तातडीने निर्णय घेऊन कार्यवाहीला सुरुवात करावी असे निर्देशही कदम यांनी महानगरपालिकेला दिले आहेत.