स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधे माँची बुधवारी दुपारी कांदिवली पोलिसांनी पुन्हा चौकशी केली. या वेळी पोलिसांनी राधे माँला २३ प्रश्न विचारण्यात आले.
निक्की गुप्ता या विवाहितेचा हुंडय़ासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात गुप्ताच्या सासरच्या मंडळीसह राधे माँवर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी तिला उच्च न्यायालयाने हंगामी जामीन देताना दर बुधवारी कांदिवली पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राधे माँ पोलीस ठाण्यात आली. पोलीस चौकशीत प्रामुख्याने डॅडी नावाने ओळखल्या जाणाऱ्या तिच्या पतीबद्दलचे प्रश्न होते. डॅडी कोण आहे, या कामात डॅडींचा काय संबंध आहे हे पोलिसांनी विचारले. या शिवाय निक्की गुप्ताकडे कधी पैशांची, महागडय़ा दागिन्यांची मागणी केली होती का, असेही विचारण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Aug 2015 रोजी प्रकाशित
राधे माँची पुन्हा चौकशी
स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधे माँची बुधवारी दुपारी कांदिवली पोलिसांनी पुन्हा चौकशी केली. या वेळी पोलिसांनी राधे माँला २३ प्रश्न विचारण्यात आले.
First published on: 20-08-2015 at 01:35 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radhe maa inquiry again