राज ठाकरेंची करोनावर मात ; आई आणि बहीण देखील करोनामुक्त

राज ठाकरे यांना करोना संसर्ग झाल्याचे २३ ऑक्टोबर रोजी स्पष्ट झाले होते.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी करोनावर मात केली आहे. तसेच, राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदाताई व त्यांची बहीण या देखील करोनामुक्त झाल्या आहेत. राज ठाकरे यांच्या चाचणीचा अहवाल आज निगेटिव्ह आला आहे. लीलावती रूग्णालयाचे डॉ. जलील पारकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना करोनाची लागण!

राज ठाकरे यांना करोना संसर्ग झाल्याचे २३ ऑक्टोबर रोजी उघड झाले होते. त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते व त्यानंतर ते गृहविलगीकरणात होते.

राज ठाकरे, त्यांच्या मातोश्री आणि त्यांच्या बहीणेने करोनाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. मात्र, त्यानंतर देखील त्यांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं होतं. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Raj thackeray recovered from corona msr

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या