ऊसदर आंदोलनात जखमी झालेल्या एका हवालदाराच्या मृत्यूप्रकरणी शिरोळ (जि. कोल्हापूर) पोलिसांनी दाखल केलेल्या खुनाच्या गुन्ह्य़ाविरोधात उच्च न्यायालयात याचिका सादर करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.
मी सरकार किंवा पोलिसांना घाबरत नसून या गुन्ह्यात अटक होऊ नये, यासाठी अटकपूर्व जामीन घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.राजकीय सूडापोटी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. त्यादिवशी घटनास्थळी आपण नव्हतोच, उलट तुरुंगातच होतो, असे शेट्टी यांचे म्हणणे आहे.
आपण आंदोलकांना हिंसा करण्याची चिथावणी दिलेली नाही. उलट शांततापूर्ण आंदोलन करण्याचे आवाहन करून पोलिसांना सहकार्यही केले होते, असे शेट्टी यांनी नमूद केले.
संग्रहित लेख, दिनांक 12th Feb 2014 रोजी प्रकाशित
गुन्ह्यविरोधात उच्च न्यायालयात जाणार-शेट्टी
ऊसदर आंदोलनात जखमी झालेल्या एका हवालदाराच्या मृत्यूप्रकरणी शिरोळ (जि. कोल्हापूर) पोलिसांनी दाखल केलेल्या खुनाच्या गुन्ह्य़ाविरोधात उच्च न्यायालयात
First published on: 12-02-2014 at 03:13 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raju shetty to move high court against murder case