रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि सारस्वत बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आय. ए. एस. परीक्षार्थीसाठी चार दिवसांची एक कार्यशाळा ५ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केली आहे. ही कार्यशाळा प्रबोधिनीच्या उत्तन येथील संकुलात होईल. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होणार असून, चाणक्य मंडळाचे संचालक व माजी ज्येष्ठ सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या क्षेत्रातील ज्येष्ठ प्राध्यापक म. मो. पेंडसे कार्यशाळेचे संचालक असतील. परराष्ट्र संबंध विषयाचे ज्येष्ठ अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर आणि लक्ष्य अकॅडमीचे अजित पडवळ हे कार्यशाळेचे विशेष मार्गदर्शक आहेत. डॉ. श्रीकांत परांजपे, शैलेंद्र देवळाणकर, अभय टिळक, रंजन कोळंबे, भूषण देशमुख, गणेश शेट्टी, अजित शेगर, आय. पी. सिंह, गायत्री गाडगीळ हे मान्यवर प्राध्यापक विविध सत्रांमधून मार्गदर्शन करतील. प्रबोधिनीचे महासंचालक डॉ. विनय सहस्रबुद्धे आणि सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांचेही विशेष मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे. आय. ए. एस.च्या मुख्य परीक्षेच्या दृष्टीने अखेरच्या टप्प्यात करावयाच्या तयारीबाबत या कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाईल. प्रबोधिनीच्या निसर्गरम्य आणि चतन्यदायी परिसरात ही कार्यशाळा होणार असून शुल्कही अत्यल्प आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी यासंदर्भात मििलद बेटावदकर (९८३३५०९२२२), मििलद चाळके (८८७९८९४६४९) आणि अनिल पांचाळ (९९७५४१५९२२) यांच्याशी संपर्क साधावा.