राज्यसभेसाठी रामदास आठवलेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आली आहे. २८ जानेवारीला आठवले राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील. बांद्रा- कुर्ला कॉम्पलेक्स मधील सोफिटेल हॉटेलमध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपकडून महाराष्ट्रातील राज्यसभेची जागा रामदास आठवलेंना देण्याचा निर्णय कळवण्यात आला. पण यावर दिल्लीत शिक्कामोर्तब झाल्यानंतरच निर्णय जाहीर करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, मंगळवारी रामदास आठवले राज्यसभेचा अर्ज भरतील.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jan 2014 रोजी प्रकाशित
रामदास आठवलेंना राज्यसभेसाठी उमेदवारी
राज्यसभेसाठी रामदास आठवलेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आली आहे.
First published on: 25-01-2014 at 06:59 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas athvale gets rajyasabha ticket