घर दुरुस्तीसाठी उसनवारी पैसे घेण्यासाठी गेलेल्या २९ वर्षीय तरुणीला शीतपेयातून गुंगीचे ओषध देऊन एका तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. ही घटना दिंडोशी येथे शनिवारी घडली. या प्रकरणी आरोपीच्या मित्राला कुरार पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
पीडित तरुणी घरकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. तिला आपल्या घराच्या दुरुस्तीसाठी तातडीने ५० हजार रुपयांची गरज होती. याबद्दल तिने आपला मित्र राजूकडे विचारणा केली होती. गोरेगावच्या दिंडोशी परिसरात राहणारा आपला मित्र विशाल उसनवारी पैसे देत असल्याचे राजूने तिला सांगितले. विशालच्या घरी जाऊन पैसे घे, असे राजूने तिला सूचित केले. शनिवारी दुपारी १ वाजता पैसे देतो, घरी ये, असे विशालने तिला सांगितले. त्यानुसार ती विशालच्या घरी गेली. विशालने गुंगीचे औषध टाकलेले शीतपेय तिला पिण्यासाठी दिले. तरुणी बेशुद्ध पडल्यानंतर विशालने तिच्यावर बलात्कार केला आणि तो पळून गेला. शुद्धीवर आलेल्या तरुणीला आपल्यावर बलात्कार झाल्याचे समजताच तिने कुरार पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि विशालविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी तात्काळ पीडित मुलीला रुग्णालयात पाठविले आणि वैद्यकीय तपासणीमध्ये तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट होताच विशालचा मित्र राजूला ताब्यात घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rape case at dindoshi
First published on: 10-11-2014 at 07:05 IST