|| अक्षय मांडवकर

‘डेझर्ट हायासिन्थ’च्या संवर्धनाचे प्रयत्न 

lokmanas
लोकमानस: धार्मिकतेला धर्मांधतेकडे वळविण्याचा प्रयत्न
girl brother attempt to kidnapped midc police saved abducted youth life
कारमध्ये कोंबून प्रेयसीच्या भावाचे अपहरण….पण,  खुनाचा प्रयत्न करताच….
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!

मुंबईच्या इतर खाडय़ांप्रमाणेच प्रदूषणाने बकाल झालेल्या गोराई खाडीच्या पाणथळ क्षेत्रात ‘डेझर्ट हायसिन्थ’ ही दुर्मीळ वनस्पती आढळली आहे. खाडय़ांमधील जैवविविधतेचा अभ्यास दुर्लक्षित राहिल्याने यापूर्वी या वनस्पतीच्या संवर्धनासाठी प्रयत्न झाले नव्हते. आता कांदळवन संरक्षण विभागाच्या तज्ज्ञांनी जागेची पाहणी केली आहे.

मुंबईच्या खाडी क्षेत्राच्या पाणथळीवर बहणारी जैवविविधता या वनस्पतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे. अत्यंत दुर्मीळ मानली जाणारी ‘डेझर्ट हायसिन्थ’ ही वनस्पती गोराई खाडी क्षेत्रात बहरल्याचे आढळले आहे. ही परावलंबी वनस्पती प्रामुख्याने कांदळवनांमध्ये आढळणाऱ्या मिसवाक झाडांच्या मुळाशी असते. ती त्या झाडांच्या मुळांवर स्वतचे पालनपोषण करते, अशी माहिती कांदळवन परिसंस्थेच्या अभ्यासक डॉ. शीतल पाचपांडे यांनी दिली. ‘डेझर्ट हायसिन्थ’ ही वनस्पती हरितद्रव्याचे (क्लोरोफिल) संश्लेषण करीत नसल्याने या वनस्पतीला हिरवा रंग नसतो. हळदी वनस्पतीसारखा मोठा तुरा येऊन वसंत ऋतूत त्याला आकर्षक पिवळी फुले येतात. त्यानंतर इतर दिवसांमध्ये ती जळलेल्या वनस्पतीसारखी दिसते.

भवन्स महाविद्यालयात वन्यजीव संवर्धन अभ्यासक्रमाचा विद्यार्थी असलेल्या अक्षय शिंदे आणि पक्षीनिरीक्षक नौशेरवान सेथना यांना ही वनस्पती गोराई खाडीत दिसली. ‘पक्षीनिरक्षणासाठी गोराई खाडीत गेलो असताना ही वनस्पती आमच्या नजरेस पडली. त्यासंबंधी माहिती काढल्यानंतर ती अत्यंत दुर्मीळ वनस्पती असल्याचे कळले,’ असे अक्षय शिंदे यांने सांगितले. ही वनस्पती २००५ आणि २०११ साली गोराई खाडीत दिसल्याची नोंद ‘फ्लॉरो ऑफ इंडिया’ या संकेतस्थळावर आहे. मात्र त्यावर शास्त्रीय अभ्यास झाला नव्हता. रविवारी वन विभागाच्या कांदळवन फाऊंडेशनअतंर्गत काम करणाऱ्यांनी या जागेची पाहणी केली. या वनस्पतीच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

डेझर्ट हायसिन्थ ही दुर्मीळ वनस्पती आहे. ती गोराई खाडीत दिसल्याने रविवारी त्या वनस्पतीची पाहणी करण्यात आली. या जागेच्या संरक्षणाबरोबरच वनस्पतीच्या संवर्धनासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.  – डॉ. शीतल पाचपांडे, सह प्रकल्प संचालिका, कांदळवन फाऊंडेशन