‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘भैरू पैलवान की जय’ अशा मराठी चित्रपटांसाठी काम केलेले ज्येष्ठ कॅमेरामन रत्नाकर लाड यांचे वृद्धापकाळाने मुंबईत गुरुवारी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि बहीण असा परिवार आहे. लाड यांच्या पार्थिवावर गुरुवारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कृष्णधवल चित्रपटांच्या काळातील प्रसिद्ध कॅमेरामन पांडुरंग नाईक यांच्या हाताखाली सहाय्यक म्हणून रत्नाकर लाड यांनी आपली कारकीर्द सुरू के ली होती. अत्यंत मनमिळावू आणि सहकलाकारांशी प्रेमळपणाने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून लाड ओळखले जात होते. ‘लाखात अशी देखणी’, ‘आराम हराम आहे’, ‘नेताजी पालकर’ अशा चांगल्या मराठी चित्रपटांसाठी त्यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले होते.
संग्रहित लेख, दिनांक 21st Aug 2015 रोजी प्रकाशित
ज्येष्ठ कॅमेरामन रत्नाकर लाड यांचे निधन
‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘भैरू पैलवान की जय’ अशा मराठी चित्रपटांसाठी काम केलेले ज्येष्ठ कॅमेरामन रत्नाकर लाड यांचे वृद्धापकाळाने मुंबईत गुरुवारी निधन झाले.
First published on: 21-08-2015 at 05:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ratnakar camera man no more