अंडरवल्र्ड डॉन रवी पुजारी याच्या मुसक्या आवळण्यास मुंबई पोलिसांनी सुरवात केली आहे. एका व्यापाऱ्याकडे दोन कोटींची खंडणी मागणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे तर गुन्हे शाखा ८ नेही रवी पुजारीच्या एका गुंडाला अटक केली आहे.
मुंबई पश्चिम उपनगरातील व्यापाऱ्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यासाठी गुंड रवी पुजारीने फोन केला होता. त्याचा तपास करताना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने तपास करून पुण्यातून समीर सय्यद, अश्रफ सय्यद व इजाज शेख या तीन गुंडाना अटक केली. त्यांच्याकडून चार रिव्हॉल्वर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वत्स यांनी सांगितले. खंडणी न दिल्यास ठार करण्याचा टोळीचा कट होता.
संग्रहित लेख, दिनांक 19th Sep 2014 रोजी प्रकाशित
रवी पुजारी टोळीच्या मुसक्या आवळल्या
अंडरवल्र्ड डॉन रवी पुजारी याच्या मुसक्या आवळण्यास मुंबई पोलिसांनी सुरवात केली आहे. एका व्यापाऱ्याकडे दोन कोटींची खंडणी मागणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे तर गुन्हे शाखा ८ नेही रवी पुजारीच्या एका गुंडाला अटक केली आहे.
First published on: 19-09-2014 at 03:09 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi pujari gang arrested