मराठा स्थापत्यशैलीचा अंश असलेली मुंबईतल्या या भागातली ही एकमेव इमारत आहे. या बिल्डिंगचं नाव रेडीमनी मॅन्शन. मुंबईतून चीनमध्ये जेव्हा अफूची निर्यात व्हायची त्यात पारशी समाजाचा वाटा खूप मोठा होता. पारशांच्या त्यावेळच्या घराण्यांकडे प्रचंड पैसा आला, ज्याच्या बळावर त्यांनी नंतर इंडस्ट्री उभारल्या.
ज्यावेळी इंग्रजांना कारभारासाठी पैशाची गरज असायची तेव्हा जे पैशाचा पुरवठा करायचे कारण त्यांच्याकडे मनी रेडी असायचा. असं वित्तसहाय्य करणाऱ्या एका कुटुंबाचं नाव पडलं रेडीमनी. या इमारतीमागचा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर…