मुंबई: बंड केलेल्या मंत्र्यांची खाती काढून घेताना एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास खाते हे सुभाष देसाई यांच्याकडे तर उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्रशिक्षण खाते हे आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. शिवसेनेच्या बंडखोर मंत्र्यांची खाती ही शिवसेनेच्याच मंत्र्यांकडे सोपविण्यात आली आहेत. राज्यमंत्रीपदाचा कार्यभार राष्ट्रवादी व काँग्रेसच्या राज्यमंत्र्यांकडे सोपविण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 बंडात शिवसेनेचे पाच मंत्री आणि चार राज्यमंत्रीही सहभागी झाले आहेत. विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी या पाच मंत्री आणि चार राज्यमंत्र्यांकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला आहे. गुलाबराव पाटील यांच्याकडील पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग अनिल परब यांच्याकडे, दादाजी भुसे यांच्याकडील कृषी व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान भुमरे यांच्याकडील रोजगार हमी, फलोत्पादन विभाग शंकरराव गडाख यांच्याकडे आणि उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.

 राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडील गृह (ग्रामीण) खाते संजय बनसोडे यांच्याकडे तर वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता,पणन ही खाती विश्वजित कदम यांच्याकडे देण्यात आली आहेत. तर सतेज पाटील यांच्याकडे उत्पादन शुल्क विभाग सोपविण्यात आला आहे. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडील वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग ही खाती विश्वजित कदम यांच्याकडे तर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण  विभाग प्राजक्त तनपुरे यांना देण्यात आला आहे.  अन्न व औषध प्रशासन खाते सतेज पाटील यांना तर आदिती तटकरे यांच्याकडे सांस्कृतिक कार्य विभाग देण्यात आला आहे.

तसेच अब्दुल सत्तार, यांच्याकडील महसूल विभाग प्राजक्त तनपुरे यांना, ग्रामविकास सतेज पाटील यांना आणि बंदरे, खार जमिनी विकास, विशेष साहाय्य खात्याचा कार्यभार आदिती तटकरे यांना देण्यात आला आहे. बच्चू कडू यांच्याकडील शालेय शिक्षण आदिती तटकरे यांना, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार खाती सतेज पाटील यांना, महिला व बाल विकास विभाग संजय बनसोड़े यांना तर मागास बहुजन कल्याण विभागाची जबाबादारी दत्ता भरणे यांच्याकडे देण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rebel unaccounted rebellious ministers duties minister state ysh
First published on: 28-06-2022 at 00:33 IST