गेल्या काही वर्षांपासून रखडलेली मुंबई अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया अखेर शुक्रवार, १३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. अग्निशामक पदाच्या तब्बल ९१० जागांसाठीची ही भरती होणार आहे. सात वर्षानंतर ही भरती होणार असून शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून दहिसर येथील भावदेवी मैदानात सरळसेवा (वॉक इन सिलेक्शन) पद्धतीने होणारी ही भरती प्रक्रिया ४ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

हेही वाचा- मुंबईत पत्नीच्या खूनाच्या आरोपाखाली पतीला अटक; पत्नीच्या कुटुंबियांकडून धर्मांतराचा आरोप

अग्निशमन दलाच्या अग्निशामक पदाची भरती प्रक्रिया भावदेवी मैदानात होणार असून त्यासाठी अग्निशमन दल सज्ज झाले आहे. भरती प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी भावदेवी मैदानात जागोजागी एकूण १६५ सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. भरती प्रक्रियेचे नऊ कॅमेऱ्यांनी चित्रीकरण करण्यात येणार आहे. या सर्व चित्रकरणासाठी एक नियंत्रण कक्षही तयार करण्यात आला आहे.या भरतीमध्ये उमेदवारांना धावणे, उंचावरून उडी मारणे, मानवकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या मार्गाने धावणे, चढणे आणि उतरणे अशी मैदानी परीक्षा होणार आहेत. तसेच उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणीही होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर त्यांना सहा महिने अग्निशमन दलाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना सेवेत रुजू केले जाणार आहे. यावेळी १२० गुणांची मैदानी चाचणी, ८० गुणांची प्रमाणपत्र चाचणी होणार आहे.मुंबई अग्निशमन दलातील अग्निशामक या पदासाठीची भरती प्रक्रिया बऱ्याच प्रतीक्षेनंतर सुरू झाली आहे. मधल्या काळात मराठा आरक्षणाचा तिढा, टाळेबंदी व करोनामुळे अग्निशमन दलातील रखडलेली भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. यापूर्वी २०१७ मध्ये अग्निशामकांची भरती झाली होती. तशीच भरती आता होणार आहे. किमान ५० टक्के गुणांनी १२ वी उत्तीर्ण इच्छुक उमेदवारांची पारंपरिक पद्धतीने शारीरिक तपासणी, वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा- बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा, पुनर्विकासाविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवलीटाळेबंदीमुळे पोलीस भरतीमध्ये जशी वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवली तशीच सूट या भरतीतही देण्यात येणार असून त्याला नुकतीच प्रशासकीय मंजुरी मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आता खुल्या गटात वयोमर्यादा २५ ऐवजी २७ वर्षे असेल तर आरक्षणासाठी हीच मर्यादा ३० ऐवजी ३२ वर्षे असेल.

हेही वाचा- कूट चलनाच्या नावाखाली मुंबई विमानतळावरील अधिकाऱ्याची फसवणूक; सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अशी आहेत पदे

आरक्षित जात प्रवर्गासह इतर समांतर आरक्षणे देखील लागू करण्यात आली आहेत. त्यानुसार

माजी सैनिक….. १३६ पदे

खेळाडू ……४६प्रकल्पग्रस्त…४६

भूकंपग्रस्त ….१७महिला ……२७३

सर्वसाधारण आरक्षण….३९२अनाथ …..९

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपंग …..३७