लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मेट्रो प्रकल्पाचे खोदकाम सुरु असताना अंधेरी पूर्व येथे सीप्झ गेट क्रमांक ३ आणि इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळील मुख्य जलवाहिनी गुरुवारी फुटली. ती दुरुस्त करण्यास शनिवारी सुरुवात करण्यात आली. मात्र अद्याप काम पूर्ण झालेले नाही. रविवारी सायंकाळपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरात आणखी काही तास पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकणार नाही.

huge investment by nine companies in pune
पुण्यातील तळेगाव दाभाडेत ह्युंदाई स्टीलसह नऊ कंपन्यांची मोठी गुंतवणूक! रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
changes in traffic route due to inauguration of underground pune metro route
मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त वाहतूक बदल, शिवाजीनगर-स्वारगेट भूमिगत मार्गिकेचे उद्या उद्घाटन
Textile project of Reliance in Palghar
पालघरमध्ये रिलायन्सचा वस्त्रोद्याोग प्रकल्प; जमिनीच्या हस्तांतरासाठी एमआयडीसीचा अर्ज, दर मात्र गुलदस्त्यात
Narendra Modi pune, Ganesh Kala Krida Rangmanch,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील कार्यक्रमाचे ठिकाण बदलण्याची शक्यता, गणेश कला क्रीडा रंगमंच येथे तयारी सुरू
Mumbai metro line 3 marathi news
मेट्रो ३ नंतर नवी मेट्रो मार्गिका २०२६ मध्ये; २ ब, ४ आणि ९ च्या पहिल्या टप्प्यातील कामे डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणार
eco friendly development in navi mumbai city green building projects in navi mumbai
 नवी मुंबईत पर्यावरणप्रिय हरित बांधकांना चालना; ‘सीआयआय-आयजीबीसी’च्या ३० व्या केंद्राचे कार्यान्वयन
Extension service time Metro 1, Metro 1,
‘मेट्रो १’च्या सेवा कालावधीत ७ आणि १७ सप्टेंबर रोजी वाढ

वेरावली जलाशयाच्या १८०० मी. मी. व्यासाच्या दोन इनलेटपैकी एक इनलेट मुख्य जलवाहिनीला अंधेरी पूर्व येथे सीप्झ गेट क्रमांक ३ आणि इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी ३० नोव्हेंबर रोजी धक्का लागला व गळती सुरु झाली. जलवाहिनीच्या तात्पुरत्या दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेण्यात आले होते. मात्र या जलवाहिनी दुरुस्तीचे मोठे काम शनिवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून हाती घेण्यात आले. हे काम रविवारी सकाळी पूर्ण होईल असे पालिकेतर्फे सांगण्यात आले होते. मात्र, या दुरुस्ती कामास तांत्रिक आव्हानामुळे अपेक्षेपेक्षा अधिक कालावधी लागला आहे.

आणखी वाचा-अंधेरीतील गोखले रेल्वे उड्डाणपुलाचा पहिली तुळई स्थापित

दुरुस्तीचे काम अविरत सुरु असून तांत्रिक आव्हानांमुळे त्यास अधिक कालावधी लागत आहे. रविवारी ३ डिसेंबर रोजी सायंकाळपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर जलवाहिनीमध्ये पाण्याचा पुरेसा दाब तयार झाल्यावर पश्चिम उपनगरात वांद्रे ते अंधेरी, जोगेश्वरी आणि पूर्व उपगरात कुर्ला ते घाटकोपरपर्यंतच्या विभागात पाणीपुरवठा केला जाईल, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कामाला विलंब का?

नादुरुस्त जलवाहिनी ही खूप खोल असून त्याला एकापेक्षा जास्त ठिकाणी हानी पोहोचली आहे. जलवाहिनीमधील पाण्याच्या दाबामुळे पूर्णपणे जलवाहिनी रिकामी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करावा लागत आहे. जलवाहिनीजवळ असणाऱ्या मातीमुळे काम करताना अडथळे निर्माण होत आहेत. या सर्व तांत्रिक आणि नैसर्गिक कारणांमुळे दुरुस्तीचे काम नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकले नाही.