लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: कूपर रुग्णालयात करोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकांकडून एका निवासी डॉक्टरला सोमवारी मारहाण झाली आहे. डॉक्टरांवरील मारहाण रोखण्यासाठी कायदा केला असला तरी रुग्णालयात पुरेशी सुरक्षा नसल्याने मारहाणीचे सत्र सुरू असल्याचे निवासी डॉक्टरांनी व्यक्त या घटनेविरोधात निषेध व्यक्त केला आहे.

Assistant Police Inspector promoted soon
आनंदाची बातमी! सहायक पोलीस निरीक्षकांना लवकरच पदोन्नती
Sassoon, pune, Sassoon dean,
ससूनमध्ये वाद पेटला! आयुक्तांच्या निर्णयाच्या विरोधात अधिष्ठात्यांची थेट भूमिका
Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल

कूपर रुग्णालयात विलगीकरण कक्षामध्ये दाखल असलेल्या करोनाबाधित रुग्णाला भेटण्याची मागणी करत दोन महिलांसह काही नातेवाईक थेट विलगीकरण कक्षात सोमवारी संध्याकाळी शिरले आणि कक्षामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले. यावेळी उपस्थित औषधशास्त्र विभागातील निवासी डॉक्टरांनी त्यांना असे करण्यास मज्जाव केल्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला. दोन महिलांनी डॉक्टरवर हल्ला केला. हाताचा चावा घेतला असून मान, हातावर या नातेवाईकांनी नखे ओरबडल्याचे निवासी डॉक्टरांनी सांगितले.

ही घटना घडली तेव्हा विलगीकरण कक्षाच्या बाहेर एक वृद्ध महिला सुरक्षा रक्षक तैनात केली होती. तिला धुडकावत नातेवाईक थेट रुग्णालयात शिरले. रुग्णाच्या आणि नातेवाईकाच्या सुरक्षेसाठी विलगीकरण कक्षात जाण्यास मनाई केली आहे. मात्र रुग्णालयात पुरेसे सुरक्षा रक्षक नसल्याने आमची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचेही पुढे निवासी डॉक्टरांनी व्यक्त केले. या आधीही परिचारिकेला मारहाण झाल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते.

यारप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी डॉक्टर रुग्णालयातही गेले होते. मात्र महिलांनी स्थानिक राजकीय व्यक्तींना बोलावून डॉक्टरांवर दबाव आणण्यास सुरूवात केली. त्यामुळे गुन्हा नोंद न करताच हे प्रकरण मिटवण्यात आले. परंतु रुग्णालय प्रशासनाने डॉक्टरांना पाठिंबा देत कोणताही संस्थात्मक गुन्हा दाखल केलेला नाही.

सुरक्षा रक्षकांची कमतरता

रुग्णालयात सध्या २४ पालिकेचे सुरक्षा कर्मचारी आहेत. याव्यतिरिक्त काही खासगी कंपनीचे सुरक्षा रक्षक आहेत. सुरक्षा व्यवस्था वाढविण्यासाठी पालिकेकडे मागणी केली जाईल. तसेच रुग्णालयात चित्रीकरण करण्यासही आता मनाई असल्याचे आदेश दिले जातील, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. यात मात्र गुन्हा का नोंद केलेला नाही याबाबत मात्र रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट काही सांगितलेले नाही