मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील करोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात येत असल्याने मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील निर्बंध शिथिल करण्यात आलेत. यानुसार आता मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील नागरिकांना आता काहिसा दिलासा मिळाला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने याबाबत बातमी दिली आहे.

मुंबईत काय सुरू होणार?

नव्या निर्णयानुसार खालील गोष्टी क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू होणार आहेत.

१. समुद्र किनारे
२. गार्डन
३. पार्क
४. जलतरण तलाव
५. वॉटर पार्क
६. थिम पार्क
७. हॉटेल
८. रेस्टॉरंट

हेही वाचा : लोकसत्ता विश्लेषण : रेल्वे मेगाब्लॉक – अपरिहार्यता आणि आव्हाने

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकूणच मुंबईतील नाईट लाईफ पुन्हा एकदा सुरू होणार आहे. असं असलं तरी अजूनही काही निर्बंध कायम आहेत. या निर्बंधांचा पुन्हा एकदा फेब्रुवारीत आढावा घेतला जाईल. तसेच त्यावेळी असलेल्या करोना संसर्गाच्या स्थितीनुसार निर्बंधांची घोषणा केली जाईल.