मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा यांनी नवनिर्वाचित काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची दिल्ली येथे त्यांच्या निवसस्थानी भेट घेतली. या वेळी त्यांनी मुंबई महापालिकेच्या आगमी सार्वत्रिक निवडणुकीबाबत चर्चा केली. अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी खरगे यांची निवड झाल्यानंतर जगताप व सप्रा यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात या वेळी खरगे यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्याचे जगताप व सप्रा यांनी सांगितले. खरगे यांना मुंबई भेटीचे निमंत्रण देण्यात आले. त्यानुसार लवकरात लवकर मुंबईला भेट देऊ, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली. शिवसेनेत फूट पडल्यामुळे सरकार कोसळले. आता राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि भाजप-शिवसेना शिंदे गट अशी सरळ विभागणी झाली आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व या विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला. आता पुढील काही महिन्यांत प्रलंबित असलेली मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचे या आधीच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी जाहीर केले आहे. आता राज्यातील व मुंबईतील राजकीय परिस्थिती बदलली आहे. त्या पार्श्वभूमीवर खरगे यांच्याशी जगताप व सप्रा यांनी चर्चा केली. त्याचबरोबर त्यांना मुंबई भेटीचे निमंत्रण देण्यात आले. त्यानुसार लवकरात लवकर मुंबईला भेट देऊ, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे सांगण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Review newly elected congress president mallikarjun kharge regarding mumbai municipal elections ysh
First published on: 22-10-2022 at 01:14 IST