माहितीच्या ढगात
यासाठी सरल्या वर्षांत चाहूल दिलेनव्या वर्षांत नवीन काय अशी उत्सुकता नेहमीच असते. मागले वर्ष विविध अॅप्स आणि टेक क्षेत्रातील विविध घडामोडींनी गाजविले. यंदाचे वर्षही खूप घटनापूर्ण असणार असून यामध्ये सर्वात मोठी गोष्ट घडणार आहे ती म्हणजे माहिती व्यवस्थापनाची. ल्या क्लाउड कम्प्युटिंगचा मोठा वाटा असणार आहे.
फेसबुक, ट्विटर अशा विविध सोशल नेटवìकग साइट्सचा वाढता वापर हा माहितीच्या महाजालावर मोठय़ा प्रमाणावर माहिती गोळा करत आहे. या माहितीचे संकलन करणे आता कंपन्यांना जिकिरीचे होऊ लागले आहे. फेसबुकचाच विचार केला तर तेथे मिनिटाला कित्येक टेरा बाइट माहिती संकलित होत असते. असे असताना या माहितीचे व्यवस्थापन करणे हे फेसबुकसाठी आजमितीस मोठे आव्हान आहे. हेच आव्हान नजीकच्या काळात आपल्याला घरातही निर्माण होणार आहे. घरातील संगणकातील माहिती कुठे साठवायची असा प्रश्न आपल्याला पडतो. अशा वेळी क्लाउड कम्प्युटिंग महत्त्वाची भूमिका बजावते. आपली सर्व माहिती साठवून ठेवण्यासाठीची क्लाउड कम्प्युटिंगची सुविधा आता घराघरापर्यंत पोहोचणार आहे. यामुळे येणाऱ्या वर्षांत स्वस्त क्लाउड कम्प्युटिंग सुविधा देणाऱ्या कंपन्यांची स्पर्धा चांगलीच रंगणार आहे. यामध्ये आयबीएम, मायक्रोसॉफ्ट अशा बडय़ा कंपन्यांचाही समावेश आहे. क्लाउड सव्र्हरवर साठवून ठेवलेली ही माहिती आपल्याला कधीही कुठेही पाहता येऊ शकते. यासाठी आपल्याला माहिती साठवून पेनड्राइव्ह घेऊन फिरण्याची गरज भासणार नाही. इतकेच नव्हे तर यामुळे नवीन तंत्रज्ञान उद्योग सुरू करण्यासाठीही मोठी मदत होणार आहे. उद्योग सुरू करायचा म्हणजे कोटय़वधी रुपये सॉफ्टवेअरच्या खरेदीत गुंतवावे लागत असत, पण क्लाउड कम्प्युटिंगमुळे आता ही गुंतवणूक निव्वळ १० टक्क्यांवर येऊन ठेपली आहे यामुळे नवीन वर्षांत तंत्रज्ञान क्षेत्रात आणखी नव्या कंपन्या उदयास येतील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
मोबाइलची स्वस्त झेप
 स्वस्तात जास्त चांगल्या दर्जाचे स्मार्टफोन बाजारात उपलब्ध होऊ शकणार आहेत. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या स्वस्त स्मार्टफोनमध्ये आपल्याला चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळत नाहीत, पण आता आणखी काही भारतीय ब्रँड स्मार्टफोनच्या बाजारात दाखल होणार असून यामुळे ही किंमत कमी होईल आणि दर्जाही चांगला मिळणार आहे. बडय़ा कंपन्यांमधील स्पर्धा कायम राहणार असून सॅमसंग आणि अॅपल आपआपले नवे फोन घेऊन बाजारात उतरणार आहेत. मोबाइलची सर्वात मोठी ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या अॅण्ड्रॉइडमध्येही भरपूर सुधारणा होणार असून िवडोजमध्ये एचटीएमएल ५मुळे सुरक्षा आणि वापरण्याचा वेग याच्यात सुधारणा होणार आहे. एमकॉमर्समध्ये लक्षणीय वाढ होणार असून यासाठी विविध अॅप्लिकेशन कंपन्या जय्यत तयारीला लागल्या आहेत. एका सर्वेक्षणानुसार ई-कॉमर्सचा सुमारे ४३% मोर्चा आता एम-कॉमर्सकडे वळणार आहे. यामुळे एम-कॉमर्स हे येत्या काळात ब्रँड आणि मोबाइल कंपन्या यांच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे.
सोशल मीडियाचे वारे
२०१४ हे निवडणुकांचे वर्ष असणार आहे. यामुळे या वर्षांत डिजिटल मीडियाचीही मोठी झलक आपल्याला पाहावयास मिळणार आहे. बहुतांश राजकीय पक्षांनी सोशल मीडिया व्यवस्थापकाची नेमणूक केली आहे. तर काहींनी थेट सोशल मीडिया कंपन्यांना कंत्राट दिले आहेत. यामुळे यामध्ये नवनवे शोध आपल्याला पाहावयास मिळणार आहेत.
वेअरेबल उपकरणे
याशिवाय २०१४मध्ये आपल्याला वेअरेबल उपकरणांची जंत्री पाहावयास मिळणार आहे. यामध्ये स्मार्ट घडय़ाळे, चष्मे, मनगटी पट्टा यांचा समावेश असणार आहे. यामुळे आपण स्मार्टफोनवरून एक पाऊल पुढे जाणार असून अधिक टेकसॅव्ही होऊ शकणार आहे. ही उपकरणे आपल्या जीवनातील अनेक कामे अधिक सोपी करणार असून एका क्लिकवर एकाच वेळी अनेक कामे करण्याची क्षमता या उपकरणांमध्ये असणार आहे.