चोरटय़ांच्या मागावर सदैव असणाऱ्या पोलिसाच्याच घरात चोरी झाल्याची घटना नेहरूनगर परिसरात बुधवारी सकाळी उघडकीस आली. चोरटय़ांनी एक-दोन नव्हे तर चार घरांवर डल्ला मारण्याचे धाडस दाखवले आहे. परंतु, केवळ एकाच घरात चोरटय़ांना ७४ हजार रुपयांचा ऐवज मिळाला असून उर्वरित तीन घरे रिकामी असल्याने चोरटय़ांच्या हाताशी काही लागले नाही. कांजूर मार्ग आणि भांडुप येथील चाळींमध्ये झालेल्या घरफोडय़ांची मंगळवारी उकल झाली असताना बुधवारी पहाटेच्या सुमारास चोरटय़ांनी थेट पोलिसांच्याच घरावर डल्ला मारला.
नेहरूनगर परिसरात जागृती नगरसमोर पोलीस कर्मचाऱ्यांच्या चार रहिवासी इमारती आहेत. दुसऱ्या माळ्यावर महादेव महाले हे निवृत्त पोलीस कर्मचारी राहतात. महाले गावी गेले होते. बुधवारी पहाटे रहिवाशांनी त्यांचे घर फोडल्याचे पाहिले. पोलिसांनी केलेल्या तपासात ७४ हजार रुपये आणि दागिने चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onचोरीRobbery
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbery in police house
First published on: 26-05-2016 at 00:30 IST