मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद उर्फ विजय दास (३०) याने भारत-बांगलादेश सीमेवरील नदी ओलांडून घुसखोरी केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. सात महिन्यांपूर्वी भारतात प्रवेश केल्यानंतर आरोपीने कोलकातातील व्यक्तीच्या नावावर सीमकार्ड खरेदी केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

ठाण्यातून अटक करण्यात आलेला आरोपी शरिफुल ऊर्फ दास हा बांगलादेशात बारावीपर्यंत शिकला आहे. सात महिन्यांपूर्वी भारतात घुसखोरी करताना त्याने कोणाचीही मदत घेतली नाही. तो स्वत: तेथील डावकी नदीतून २०० मीटर पोहून भारतात दाखल झाला. भारतात आल्यावर विजय दास नाव सांगू लागला. कोलकात्यामध्ये तो काही काळ वास्तव्याला होता. त्यावेळी त्याने कोलकात्यातील एका व्यक्तीच्या नावाने मोबाइल सीमकार्ड खरेदी केले. ते सीमकार्ड खुकूमोनी जहांगीर सेख नावावर आहे. त्याच्या सीमकार्डचा वापर करून आरोपीने सीमकार्ड खरेदी केले, अशी माहिती सूत्रांनी दिली. पोलीस या माहितीची पडताळणी करत आहेत. कोलकात्यावरून तो नोकरीसाठी मुंबईत आला. त्यावेळी कंत्राटदार अमित पांडे यांच्या माध्यमातून वरळी व ठाण्यातील हॉटेलमध्ये त्याला नोकरी मिळाली होती.

Gujarat Police officer son robbed in pune news
पुणे: गुजरातमधील पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाला नदीपात्रात लुटले
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
residents allege conspiracy to hinder adarsh nagar colony rehabilitation project in worli mumbai
खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी मोकाट; पुनर्वसन प्रकल्प बंद पाडण्याचे षडयंत्र, रहिवाशांचा आरोप
Frequent attacks on teams preventing illegal sand mining Threat to kill female Talathi
वाळू माफियावर महसूल प्रशासनाचा वचक नाही? अवैध वाळू उपसा रोखणाऱ्या पथकांवर वारंवार हल्ले
Mumbai crime
मुंबई : आरोपीचा न्यायालातून पळून जाण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
Saif Ali Khan attack case, Saif Ali Khan,
सैफ हल्ला प्रकरण : आरोपीचा चेहऱ्याच्या पडताळणीचा अहवाल पोलिसांना प्राप्त, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल
Image Of Saif Ali Khan
Saif Ali Khan Attack : “गरज पडली तर पोलीस…”, सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी गृहराज्यमंत्र्यांनी दिली मोठी अपडेट
Saif Ali Khan Records Statement With Mumbai Police
Saif Ali Khan : सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

हेही वाचा : एकनाथ शिंदेंच्या नाराजीमुळेच पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती

चोरीच्या उद्देशाने आरोपी सैफचा मुलगा जहांगीरच्या खोलीत शिरला. त्या खोलीत दोन महिला कर्मचारी झोपल्या होत्या. यातील एका महिला कर्मचाऱ्याला त्याने आधी शांत राहण्यास सांगून धमकावले. तसेच १ कोटी रुपये मागितले. त्यावेळी लिमा या सैफच्या लहान मुलाला उचलण्यासाठी गेल्या असता आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी सैफ अली खान व करीना दोघेही तेथे पोहोचले. त्यावेळी हल्लेखोराने हेक्सा ब्लेडसारख्या चाकूने सैफवर हल्ला केला. तैमुरची आया गीता यादेखील मधे पडल्याने जखमी झाल्या होत्या.

हेही वाचा : पाच पोलिसांमुळेच आरोपीचा मृत्यू, बदलापूरप्रकरणी चौकशी अहवालातील निष्कर्ष

बांगलादेशातील कुटुंबीयांशी संपर्क

आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत त्याला कोलकात्याबाबत विचारले असता त्याला उत्तर देता आले नाही. त्यावेळी त्याला विचारले असता त्याने आपण बांगलादेशी नागरिक असल्याचे मान्य केले. त्याच्या मोबाइलमध्ये काही अॅप्लिकेशन सापडली आहेत. त्याद्वारे आरोपी बांगलादेशातील कुटुंबीयांशी संपर्क साधायचा. त्यावरून पोलिसांनी त्याच्या भावाशी संपर्क साधून त्याच्या जन्माचा दाखला मागवून घेतला. त्यावरून तो बांगलादेशी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले, असे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader