लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा फोटो त्यांची पत्नी सायरा बानू यांनी अमिताभ बच्चन यांना पाठवल्याने ते खूपच आनंदित झाले आहेत. त्यांनी हा फोटो ट्विटरवर शेअर केलाय. दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, त्यांना लवकरच रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याच्या माहितीने आणि सोबत थेट रुग्णालयातून त्यांचा फोटो मिळाल्याने अमिताभ बच्चन आनंदित झाले.
‘आपल्यासाठी आनंदाची आणि अभिमानाचा क्षण आहे. सायराजींनी मला हा फोटो पाठवलाय. दिलीपसाहेब यांच्याकडून तुम्हाला अत्यंत प्रेमाने आणि थेट रुग्णालयातून…’ अशा आशयाचे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले.
दिलीपकुमार यांना शनिवारी पहाटे श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ लागल्याने तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ९३ वर्षीय दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांची प्रकृती उपचारांना प्रतिसाद देत आहे.
T 2230 – Moment of joy and pride .. Saira ji sends me this :
“from Dilip Saab to you with love from the hospital” pic.twitter.com/JbEqQBzAQq— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 18, 2016