सलमानने १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या याकूब मेमनच्या समर्थनार्थ केलेले ट्विट मागे घेतले आहे. सलमानने आपले ट्विट मागे घेत म्हटले की,  मी याकूब मेमनचे समर्थन केलेले नाही. मी टायगर मेननला त्याच्या गुन्ह्याबद्दल फाशी द्यावी असे ट्विट केले होते. तसेच त्याच्यासाठी याकूब मेननला फाशी देऊ नये असे म्हणालो होतो. मुंबईच्या बॉम्बस्फोटात अनेक जण मृत्यूमुखी पडले होते आणि निष्पाप जिवांचा बळी म्हणजे मानवतेचा बळी असल्याचे मी नेहमीच सांगत असतो. आपल्या देशातील न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्‍वास आहे. तसेच, वडिलांनी सांगितल्यावर मी माझे ट्विट मागे घेत आहे. माझ्या ट्विटमुळे गैरसमज निर्माण झाले असून, त्याबद्दल मी माफी मागतो.
दरम्यान, सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेण्टबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


काय होते सलमानचे ट्विटः
एक निर्दोष मेला तर माणुसकीचा खून होईल, फाशी द्यायची असेल तर टायगरला दया, त्याच्या भावाला नको. टायगरच्या गुन्ह्याची शिक्षा त्याचा भाऊ याकूबला का देता? याकूबच्या समर्थनार्थ सलमानने शनिवारी रात्री १४ ट्विट केले आहे. मुंबई बाँबस्फोटाचा खरा आरोपी टायगर मेमन आहे. त्याला फासावर लटकवा. त्याला शिक्षा द्या, त्याचा भाऊ याकूबला नको.  टायगर कुठे लपून बसला आहे ? तो टायगर नाहीच,  तो तर मांजर आहे. आणि आपण एका मांजरीला पकडू शकत नाही. सुरुवातीला घाबरत होतो टि्विट करायला पण एक निर्दोष फासावर लटकत असल्याने टि्विट करावे असे वाटले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan comes to yakubs defence says parade and hang tiger memon
First published on: 26-07-2015 at 11:23 IST