आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केलेत. समीर वानखेडे यांनी आपल्या जावयाला अटक केली. त्यानंतर आता ते मुलगी निलोफरचे सीडीआर मिळवण्यासाठी समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांनी पत्र लिहिलंय. निलोफर मलिक गुन्हेगार आहे का? कोणत्या आधारावर त्यांनी ही माहिती मागितली? मला वाटतंय की वानखेडे मर्यादा ओलांडत आहे. समीर वानखेडे दोन लोकांच्या मदतीने लोकांचे फोन टॅप करत आहेत. लोकांचे कॉल्स इंटरसेप्ट केले जात आहेत, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय.

नवाब मलिक यांचे पत्र खोटे आणि विनोदी असल्याचं समीर वानखेडे म्हणाले. नवाब मलिक त्यांना हवे ते करू शकतात, त्यांनी जारी केलेल्या पत्रातील सर्व गोष्टी खोट्या आहेत, असं वानखेडे यांनी सांगितलं. “हे सर्व खोटं आणि विनोदी आहे. मंत्री नवाब मलिक यांना जे काही करता येईल ते करू द्या. त्यांनी लावलेले सर्व आरोप खोटे आहेत,” असे समीर वानखेडे यांनी मलिक यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना सांगितले.

समीर वानखेडे मुंबई आणि ठाण्यात दोन व्यक्तींमार्फत काही लोकांचे मोबाईल फोन बेकायदेशीरपणे टॅप करत आहेत. तसेच वानखेडे यांनी पोलिसांकडून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) मागितले होते, असा दावाही मलिक यांनी केला होता. तसेच समीर वानखेडेंच्या कुकर्मांचे पत्र ते लवकरच समोर आणतील, असंही ते म्हणाले होते.