मुंबई : भरधाव वेगात धावणाऱ्या एका वाहनाने धडक दिल्याने सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. मालाडमधील काचपाडा येथे शुक्रवारी दुपारी हा अपघात झाला.सफाई कर्मचारी ब्रिजेश गुप्ता (४३) शुक्रवारी दुपारी मालाड (पश्चिम) येथील काचपाडा परिसरातील ऑरिस सेरेनिटी इमारतीच्या समोर साफसफाईचे काम करीत होता. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या एका वाहनाने त्याला धडक दिली.
गंभीर जखमी झालेल्या गुप्ताला उपचारासाठी कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मालाड पोलिसांनी वाहनचालक अशोक गुप्ता (४५) विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (१) आणि २८१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.