वन्य प्राण्यांना दत्तक घेण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची योजना

या प्राण्यांना दत्तक घेतल्यामुळे वने व वन्यजीव संवर्धनाच्या अनमोल कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी सर्वांना मिळणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फे वन्य प्राणी दत्तक योजना राबविण्यात येते.सिंह, वाघ, बिबट, वाघाटी अशा अनेक बंदिस्त वन्य प्राण्यांची देखभाल इथे केली जाते. या प्राण्यांना दत्तक घेतल्यामुळे वने व वन्यजीव संवर्धनाच्या अनमोल कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. वन्यजीव प्रेमी, संस्था आणि कंपनी यांनी प्राण्यांना एका वर्षांकरिता दत्तक घेऊन वन्यजीव व्यवस्थापनात सहभागी व्हावे असे आवाहन वनसंरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जी. मल्लिकार्जुन यांनी केले आहे. ही दत्तक रक्कम एका वर्षांसाठी आहे.

वाघ ३ लाख १० हजार, सिंह रुपये ३ लाख, बिबटे एक लाख २० हजार, वाघाटी ५० हजार, नीलगाय ३० हजार, चितळ २० हजार, भेकर १० हजार रुपयांना दत्तक घेता येईल. संपूर्ण माहिती आणि आवेदन करण्याकरिता इच्छुकांनी खालील कार्यालयाशी संपर्क साधावा. वन संरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली (पूर्व) मुंबई २. अधिक्षक, सिंह विहार, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली (पूर्व), मुंबई. ईमेल — lionsafaripark@gmail.com भ्रमणध्वनी — ७०२०२८२७१४.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sanjay gandhi national park scheme for wildlife adoption zws