मुंबई: शूर मराठा सरदार रघुजी राजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार राज्य सरकारने लंडनच्या लिलावात ६९ लाख ९४ हजार ४३७ रुपयांना खरेदी केली आहे. ही तलवार जुलैच्या शेवटच्या आठवड्यात अथवा १५ ऑगस्टच्या आधी लंडनहून महाराष्ट्रात परत आणू, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधिमंडळाच्या उभय सभागृहांमध्ये दिली.
नागपूरच्या भोसले घराण्यातील शूर मराठा सरदार राजे रघुजी भोसले यांची तलवार ही लिलावात निघाली होती आणि त्याला भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्र सरकारची मालमत्ता समजून ती पुन्हा आणण्यासाठीचा प्रयत्न यशस्वी ठरला.
प्रवीण चल्ला यांच्या माध्यामतून महाराष्ट्र शासनाने त्या लिलावात बोली केली आणि जवळ जवळ ६९ लाख ९४ हजार ४३७ करासहीत ही तलवार आपल्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्या व्यवस्थेबरोबर करारनामा झाला. त्यासाठीच्या खर्चास २१ मे २०२५ रोजी मान्यता दिली. पुढील सर्व प्रक्रियेसाठी स्टार वर्ल्ड वाईड ग्रुप प्रा. लि. या कंपनीची नियुक्ती करून १५ ऑगस्टच्या आधी ही तलवार आपण सन्मानपूर्वक महाराष्ट्रात या भूमीमध्ये परत आणू आणि ती सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती शेलार यांनी दिली.