मुंबई पोलिसांकडून ३ ते १७ डिसेंबर दरम्यान मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आल्याचे वृत्त काल विविध माध्यमांनी प्रसिद्ध केले होते. हे वृत्त चुकीचं असल्याचे मुंबई शहरचे सहपोलीस आयुक्त (कायदा-सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील म्हटले आहे. हे वृत्त गैरसमज निर्माण करणारे असल्याचे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – मुंबईत ४२ वे अवयवदान; दोघांना मिळाले जीवदान

कलम १४४ लागू झाल्यानंतर मुंबईत ३ ते १७ डिसेंबर दरम्यान जमावबंदी लागू असेल असे वृत्त अनेक माध्यमांनी प्रसिद्ध केले होते. दरम्यान, हे वृत्त चुकीचं असल्याचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटले आहे. “मुंबई शहरात मुंबई पोलिसांकडून कलम १४४ म्हणजेच जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आल्याची बातमी आहे. ही बातमी चुकीची आणि गैरसमज निर्माण करणारी आहे. मुंबई शहरामध्ये मुंबई पोलिसांकडून मुंबई पोलीस अॅक्ट ३७ (१) अन्वये जे लोकं बेकायदेशीर मोर्चे, निदर्शने काढतात, कायदा सुवस्थेस बाधा निर्माण करतात, त्यांच्या विरोधात आदेश दर १५ दिवसांनंतर काढण्यात येतो. या आदेशांचा लोकांच्या सर्वसामान्य जिवनाशी अजिबात संबंध नसतो”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – डहाणुकरांसाठी खुषखबर…; लवकरच १५ डब्यांच्या लोकलमधून प्रवास घडणार

जमावबंद म्हणजे म्हणजे काय?

जमावबंदी म्हणजे पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचे एकत्र येणे, एकत्र येऊन प्रवास करण्यावर बंदी. जमावबंदीच्या आदेशांत खासगी, सार्वजनिक ठिकाणांचा समावेश होतो. जमावबंदीचे आदेशही फौजदारी दंड संहितेच्या १४४ कलमान्वये जारी केले जातात. युद्ध, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती, एखादा अपघात, अशा कृतीला आळा घालण्यासाठी फौजदारी दंड संहितेतील १४४ कलमान्वये पोलीस किंवा तत्सम प्राधिकाऱ्यांना जमावबंदी किंवा संचारबंदीचे आदेश जारी करता येतात. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईचे अधिकारही तत्सम प्राधिकाऱ्यांना उपलब्ध होतात. या आदेशांतून किंवा निर्बंधांतून अत्यावश्यक सेवा बजावणारे पोलीस, महापालिका कर्मचारी, आरोग्य सेवेशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी, अत्यावश्यक वस्तूंची ने-आण करणारी व्यवस्था आणि माध्यमांना सूट दिली जाऊ शकते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Section 144 imposed in mumbai to maintain law and order spb
First published on: 02-12-2022 at 20:52 IST